प्रियंका गांधींच्या गोमूत्र-तज्ञ विधानाविरोधात ऑनलाइन याचिका:आयआयटी मद्रास संचालकांच्या समर्थनार्थ 38 देशांतील शास्त्रज्ञांसह 14 हजार लोक एकत्र आले
IIT मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांना गोमूत्र तज्ज्ञ संबोधणाऱ्या विधानावरून वाद वाढला आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या विरोधात ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या याचिकेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, प्रियंका गांधी यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी…