Headlines

Chhagan Bhujbal Statement On Prashant Kishor & NCP Internal Conflict


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षातील सद्य:स्थिती, नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सविस्तर व स्पष्ट भाष्य केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षा

.

प्रशांत किशोरांच्या भेटीला फार महत्त्व न देण्याचा सल्ला

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवरून पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “प्रशांत किशोर हे अनेक राजकीय नेत्यांना भेटत असतात. ते आम्हालाही अनेकदा भेटतात. पण केवळ ते सुनेत्रा वहिनींना भेटले, याचा अर्थ त्यांची पक्षाचे ‘राष्ट्रीय सल्लागार’ म्हणून अधिकृत नियुक्ती झाली आहे, असा अजिबात होत नाही. सुनेत्राताई पवार या आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला भेटावे आणि कोणाशी चर्चा करावी, हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचाच आहे. त्यासाठी त्यांना कोणाच्याही परवानगीची गरज नाही.”

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची पाठराखण

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाहीत, असा आरोप पक्षातील काही नेत्यांकडून (विशेषतः रुपाली ठोंबरे आणि उमेश पाटील यांच्याकडून) केला जात आहे. यावर भुजबळांनी दोन्ही नेत्यांची पाठराखण केली.

ते म्हणाले, “सध्या दिल्लीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सुरू आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन्ही नेते संसदेच्या कामकाजात व्यग्र आहेत. त्यामुळे ते कदाचित मुंबईत ‘देवगिरी’ बंगल्यावर किंवा इतर ठिकाणी जास्त वेळ देऊ शकले नसतील. पण माझ्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ते मुंबईत होते आणि त्यांच्यात बैठका व चर्चाही झाल्या आहेत. याशिवाय फोनवरूनही सर्व नेत्यांचा सातत्याने संपर्क असतो. त्यामुळे या विषयाचा वेगळा अर्थ काढून तो फार गांभीर्याने घेण्याचे कोणतेही कारण नाही.”

अजितदादांवर प्रेम होते म्हणूनच पवार साहेबांना सोडले

अजितदादांवर कोणाचे किती प्रेम होते आणि आता कोण कसे वागत आहे, यावरून पक्षात जो कलह सुरू आहे, त्याला भुजबळांनी अत्यंत सडेतोड शब्दांत उत्तर दिले. “कोण कोणाबद्दल काय बोलत आहे, हे स्पष्ट झालेले नाही. पण आमचे अजितदादांवर निस्सीम प्रेम होते आणि त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास होता. म्हणूनच आम्ही सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी खुद्द शरद पवार साहेबांची साथ सोडून अजितदादांसोबत येण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला होता, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे,” अशी आठवण भुजबळांनी करून दिली.

पक्षांतर्गत मतभेद आणि एकजुटीचे आवाहन

शेवटी पक्षातील वाढत्या अंतर्गत वादावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, “अजितदादा आता आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात आपल्याला हा पक्ष अत्यंत खंबीरपणे सांभाळायचा आहे आणि पुढे न्यायचा आहे. हे करत असताना सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्षाची ताकद कशी वाढेल, याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. एका घरातही अनेकदा मतभेद होतात. माझा येवला हा छोटासा मतदारसंघ आहे, तिथेही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात. पण सर्वांना सोबत घेऊनच मार्ग काढावा लागतो. त्यामुळे पक्षातील सर्वच नेत्यांनी थोडी सामंजस्याची आणि संयमाची भूमिका घ्यावी.”

हेही वाचा…

जगदंबेची शपथ घेऊन सांगते, अजितदादांना प्रदेशाध्यक्ष बदलायचाच होता!: रूपाली ठोंबरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठा अंतर्गत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा’ थेट सल्ला दिला आहे. प्रशांत किशोर यांच्या या सल्ल्यानंतर पक्षातील जुना वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “मी कुलदैवत जगदंबा मातेची शपथ घेऊन सांगते, प्रदेशाध्यक्ष बदलावा ही स्वतः अजितदादांचीच तीव्र इच्छा होती आणि ते अजितदादांचे स्वप्न होते,” असा मोठा बॉम्ब रूपाली ठोंबरे यांनी टाकला आहे. प्रसारमाध्यमांशी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना रूपाली पाटील ठोंबरे यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यपद्धतीवर थेट ताशेरे ओढले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी

सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना प्रशांत किशोर यांचा थेट अल्टीमेटम, राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण

अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.