Headlines

How to Fill SIR Form Online 2026



सध्या महाराष्ट्रासह देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल परीक्षण, म्हणजेच ‘एसआयआर’ (Special Investigation of Rolls – SIR) मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन मतदारांना एक महत्त्वाचा फॉर्म देत आहेत. हा फॉर्म तुम्ही ऑनलाई

.

फॉर्म भरण्यापूर्वी करायची सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी

ॲप डाऊनलोड करा: सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले-स्टोअर (Play Store) वर जाऊन ECINET हे अधिकृत ॲप सर्च करा आणि ते इन्स्टॉल करा.

नोंद शोधा व स्क्रीनशॉट घ्या: ॲप ओपन केल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. सर्वप्रथम 2002 च्या मतदार यादीच्या लिस्टमध्ये तुमच्या आईचे किंवा वडिलांचे नाव शोधा. जर पालकांचे नाव नसेल, तर घरातील इतर जवळच्या नातेवाईकांचे नाव शोधा. हे नाव सापडताच त्याचा एक स्क्रीनशॉट (Screenshot) काढून मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवा. हा स्क्रीनशॉट तुम्हाला पुढे फॉर्म अपलोड करताना लागणार आहे.

लॉगिन आणि रजिस्ट्रेशन कसे करावे?

  • ॲपच्या होम स्क्रीनवर असलेल्या Voter Registration Form या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर समोर येणाऱ्या SIR form fill Online या बटणावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. जर तुमचे आधीच अकाऊंट असेल, तर नंबर टाकून ओटीपी (OTP) द्वारे थेट लॉगिन करा.
  • जर तुम्ही नवीन युझर असाल, तर New User वर क्लिक करून मोबाईल नंबर टाका, ओटीपी पडताळणी करा आणि तुमचे नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण करा. रजिस्ट्रेशन झाल्यावर पुन्हा वरील पर्यायांवर क्लिक करून पुढे जा.

Enumeration Form भरण्याची मुख्य प्रक्रिया

स्टेप 1: राज्याची निवड आणि व्हेरिफिकेशन

ॲपमध्ये तुमचे राज्य निवडा आणि तुमचा EPIC नंबर (मतदार ओळखपत्र क्रमांक) टाकून सबमिट करा. यानंतर तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.

महत्त्वाची टीप: या माहितीमधील तुमचे इंग्लिश नाव आणि सरकारी ओळखपत्रावरील (जसे की आधार कार्ड) इंग्लिश नाव जर तंतोतंत जुळत असेल (Same असेल), तरच तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरता येईल. नावात किंवा स्पेलिंगमध्ये काहीही चूक असल्यास, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच फॉर्म भरावा लागेल.

स्टेप 2: मोबाईल नंबर लिंकिंग

जर तुमचा मोबाईल नंबर मतदार आयडीशी लिंक नसेल, तर स्क्रीनवर खाली दिलेल्या Click Here या पर्यायावर क्लिक करून आधी मोबाईल नंबर लिंक करून घ्या. याशिवाय पुढील प्रक्रिया सुरू होणार नाही. नंबर लिंक झाल्यावर Enumeration Form वर परत येऊन ओटीपी सबमिट करा.

ओटीपी टाकल्यानंतर समोर येणारे 4 मुख्य पर्याय: योग्य पर्याय कसा निवडायचा?

ओटीपी सबमिट केल्यावर तुमच्यासमोर 4 पर्यायांची स्क्रीन दिसेल. तुमच्या परिस्थितीनुसार खालीलपैकी एका पर्यायाची निवड करा:

पर्याय 1: जर तुमचे स्वतःचे नाव 2002 च्या एसआयआर (SIR) यादीत समाविष्ट असेल, तर हा पहिला पर्याय निवडा.

पर्याय 2: जर तुमचे नाव 2002 च्या यादीत नसेल, पण तुमच्या आई-वडिलांचे नाव त्या यादीत असेल, तर हा दुसरा पर्याय निवडून त्यांचे नाव सर्च करा आणि त्यांचा पार्ट/सिरियल नंबर (Serial Number) टाकून फॉर्म सबमिट करा.

पर्याय 3: जर तुमचे किंवा आई-वडिलांचे नाव 2002 च्या यादीत नाही, पण चालू 2025-26 च्या मतदार यादीत आई-वडिलांचे नाव समाविष्ट असेल, तर हा तिसरा पर्याय निवडा. त्यांचे नाव शोधून सिरियल नंबर टाकून फॉर्म सबमिट करा.

पर्याय 4: जे मतदार वरील तिन्ही अटींमध्ये बसत नाहीत (म्हणजेच ज्यांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे नाव कोणत्याही जुन्या किंवा नव्या एसआयआर यादीत सापडत नाही), त्यांनी या चौथ्या पर्यायाची निवड करायची आहे. हा पर्याय निवडून आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा आणि फॉर्म सबमिट करा.

मतदार अर्ज अपलोड झाला की नाही? ‘असे’ तपासा स्टेटस

मतदार नोंदणी किंवा दुरुस्तीचा अर्ज ऑनलाईन सबमिट केल्यानंतर तो यशस्वीरीत्या अपलोड झाला आहे का, हे जाणून घेणे आता सोपे झाले आहे. खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरबसल्या तुमच्या अर्जाची स्थिती (Status) तपासू शकता:

पहिली पायरी (नोंदणी व लॉगिन): सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. मुख्य पानावर असलेल्या ‘Fill Enumeration Form’ या पर्यायावर क्लिक करा. जर तुमचे अकाऊंट नसेल, तर मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून ‘Sign Up’ करा. यानंतर ओटीपी (OTP) च्या माध्यमातून लॉगिन करा.

दुसरी पायरी (स्टेटस तपासणे): लॉगिन झाल्यावर पुन्हा ‘Fill Enumeration Form’ वर जा. तिथे तुमचा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक टाकून ‘Search’ बटनावर क्लिक करा.

काय दर्शवतो तुमच्या अर्जाचा निकाल?

अर्ज आधीच सबमिट झाल्याचा मेसेज आल्यास: तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या अपलोड झाला आहे.

नवीन फॉर्म भरण्याची विंडो उघडल्यास: याचा अर्थ तुमचा अर्ज अद्याप सिस्टममध्ये अपलोड झालेला नाही.

महत्त्वाची सूचना: जर स्टेटसमध्ये चुकीचा मोबाईल नंबर दिसत असेल किंवा तुम्ही अर्ज केलेला नसतानाही तो सबमिट झाल्याचे दाखवत असेल, तर विनाविलंब तुमच्या भागातील बीएलओ (BLO) यांच्याशी संपर्क साधा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.