Headlines

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी




काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी बंडखोरी करत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता लोकसभा सचिवालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. लोकसभा अध्यक्षांनी या ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी हा निर्णय देण्यात आला. बंडू जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाघचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील या सहा खासदारांचा निर्णय लोकसभा सचिवालय यांच्याकडे प्रलंबित होता. आज दिवसभर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र पार पडले. त्यानंतर आता सायंकाळी लोकसभा सचिवालयाकडून बुलेटिन जारी करत, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील ६ बंडखोर खासदारांच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षातील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांची संख्या अधिकृतपणे १३ झालेली आहे. या फुटील खासदारांच्या गटाचे नेते म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आलेली आहे. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *