Headlines

Maharashtra HSRP Deadline Ends; Pratap Sarnaik Warns of Strict Action


राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आज (३० जून) संपत आहे. “आम्ही आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. उद्यापासून (१ जुलै) विन

.

देशविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी निर्णय या नंबर प्लेट्सचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “ज्या पद्धतीने राज्यात आणि देशात देशविरोधी कारवाया घडतात, ते पाहता सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने HSRP नंबर प्लेट्स अत्यंत आवश्यक आहेत. मुंबईसह अनेक राज्यांमध्ये देशविरोधी घटकांनी केलेल्या हल्ल्यांनंतरच प्रत्येक वाहनावर ही हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे संशयास्पद वाहनांची ओळख पटवणे आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे सोपे होते.”

एजंटच्या आमिषाला बळी पडू नये

वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

उद्यापासून दंडात्मक कारवाईचा बडगा

आज ३० जून रोजी ही मुदत संपुष्टात येत असल्याने उद्यापासून परिवहन विभाग आणि ट्रॅफिक पोलिसांकडून राज्यभर धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्या वाहनधारकांनी अजूनही HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना आता मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने ऑनलाइन नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा..

ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी

विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होते.

सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आदित्य ठाकरे यांना सर्वांत मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात विधान परिषदेचे दोन आमदार होते. वरळी विधानसभा मतदासंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.