पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून महिनोन्महिने मैदानावर घाम गाळणाऱ्या राज्यातील हजारो तरुणींसाठी राज्य सरकारने एक अत्यंत संवेदनशील आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ऐन शारीरिक चाचणीच्या (मैदानी चाचणी) दिवशी मासिक पाळी आल्यामुळे शारीरिक वेद
.
मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी सकारात्मक चर्चा; यंदाच्याच भरतीत तरतूद
मैदानी चाचणीच्या दिवशी महिला उमेदवारांना येणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींबाबत सरकार अत्यंत सकारात्मक असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, “पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी एखाद्या महिला उमेदवाराला मासिक पाळी किंवा तत्सम आरोग्यविषयक अडचण उद्भवल्यास तिला दुसरी संधी दिली जाईल. अशा उमेदवारांना 4 ते 5 दिवसांचा वाढीव कालावधी (ग्रेस पिरियड) देऊन त्याच भरती टप्प्यात पर्यायी तारीख दिली जाईल.”
यंदाच्याच पोलीस भरतीच्या अधिसूचनेत (नोटिफिकेशन) या विशेष तरतुदीचा समावेश करावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांशीही (डीजीपी) यासंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली आहे. उमेदवारांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर जास्तीत जास्त उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मासिक पाळी ही नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया असली तरी या काळात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. प्रत्येक तरुणीला होणारा त्रास वेगवेगळा असला, तरी ऐन मैदानी परीक्षेच्या दिवशी हा त्रास उद्भवल्यास त्यांच्या कामगिरीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
तरुणींकडून निर्णयाचे स्वागत; अधिकृत नियमावलीकडे लक्ष
खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणी कित्येक महिने कठोर सराव करतात. मात्र, ऐन परीक्षेच्या दिवशी मासिक पाळी आल्यास वेदनेमुळे त्यांची सर्व मेहनत वाया जाण्याची भीती असते. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केवळ एका नैसर्गिक प्रक्रियेमुळे कोणत्याही तरुणीवर अन्याय होणार नाही, अशी भावना व्यक्त करत राज्यभरातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. आता या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी वैद्यकीय तपासणीचे नेमके निकष काय असतील आणि गृह विभागाकडून अधिकृत नियमावली कधी प्रसिद्ध केली जाईल, याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
——————————————
हेही वाचा…
मेरिटवर शिवसेना कालही उद्धवजींचीच होती आणि उद्याही राहील : बारामती विमानतळाचानिधी आधीच मिळाला असता तर कदाचित दादांचा अपघात टळला असता –सुप्रिया सुळे

सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. “मी कोणतीही भविष्यवाणी करत नाही; मात्र गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर शिवसेना हा पक्ष कालही उद्धव ठाकरे यांचाच होता, आजही आहे आणि उद्याही त्यांचाच राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती विमानतळाच्या विकासासाठी मंजूर झालेला 64 कोटी रुपयांचा निधी, इंदापूरमधील मतदार यादीतून नावे वगळल्याची कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप, दुष्काळी परिस्थिती आणि शरद पवार यांच्या बारामती दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी