Headlines

Maharashtra Self Census 2026: Process & Dates


7 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशात जनगणनेच्या प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली असून नागरिकांच्या सोयीसाठी यावेळेस डिजिटल पद्धतीने ‘स्व-गणना’ प्रक्रियाही सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ‘स्व-गणने’चा कालावधी हा १ ते १५ मेपर्यंत असणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष ‘घरगणना’ केली जाईल. या टप्प्यात प्रगणक प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी गृहभेटी देतील.

अशी करा स्व-गणना

केंद्र सरकारने जनगणना २०२७ साठी https://se.census.gov.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे या संकेतस्थळावरून नागरिकांना घरबसल्या स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यादरम्यान एकूण ३४ प्रश्नांची उत्तर देऊन नागरिकांना आपली माहिती स्व-गणनेत नोंदवता येईल. स्व-गणनेची प्रक्रिया नागरिकांना कळावी यासाठी देशभरातील विविध भाषांतील व्हिडिओही सरकारच्या वतीने यू-ट्यूबवर टाकण्यात आले आहे.

स्व-गणना कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा…

पुणे विभागीय आयुक्तांनी केली स्व-गणना:नागरिकांना 15 मे पर्यंत स्व-गणना करण्याचे आवाहन

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली ‘स्व-गणना’ पूर्ण केली.

यावेळी विभागीय आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की, देशाच्या नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती अचूक भरावी आणि जनकल्याणासाठी असलेल्या या जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा. वाचा पूर्ण बातमी…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.