Headlines

MPSC Paper Leak Controversy: Fake Complaint Allegations


MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांना आता नवे वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा ई-मेलद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर

.

“पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही, याच भीतीने फेरपरीक्षेसाठी हा बनाव रचला होता,” असे या नव्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. मात्र, तक्रारदाराच्या या अचानक घेतलेल्या यू-टर्नवर आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला असून, यामागे ‘दबावतंत्र’ असण्याची शक्यता वर्तवत सखोल चौकशीची मागणी कायम ठेवली आहे.

नेमका घटनाक्रम काय?

औषध निरीक्षक पदाच्या भरतीसाठी २२ मार्च २०२६ रोजी लेखी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी लागला, तर जुलै महिन्यात मुलाखती पूर्ण होऊन २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. मात्र, ही यादी प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २३ जुलै रोजी आयोगाला एक निनावी ई-मेल आला. या ई-मेलमध्ये परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर प्रश्न व्हायरल झाल्याचा आणि गुणांमध्ये विसंगती असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

MPSC ची तत्पर कारवाई आणि चौकशी

तक्रार प्राप्त होताच MPSC ने तातडीने पावले उचलली. आयोगाने संबंधित तक्रारदाराला सर्व डिजिटल पुरावे सादर करण्यास सांगितले. तसेच, संशयित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे कडक निर्देश दिले. आज या सर्वांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

तक्रारदाराचाच कथित यू-टर्न

चौकशीची चक्रे वेगाने फिरत असतानाच, या प्रकरणाला काल रात्री एक नवे वळण मिळाले. आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने MPSC ला आणखी एक ई-मेल पाठवला आहे. यात त्याने कबुली दिली आहे की, ‘पूर्वी केलेली तक्रार पूर्णपणे बनावट होती. MPSC ची परीक्षा पुन्हा लवकर होणार नाही, त्यामुळे ही परीक्षा रद्द होऊन फेरपरीक्षा व्हावी, यासाठीच पेपरफुटीचा हा खोटा बनाव रचण्यात आला होता.’ तसेच, २० मार्च रोजी कथित संभाषण झाले असताना तक्रार करण्यासाठी जुलै महिन्यापर्यंत एवढा विलंब का झाला? याचाही तपास आता यंत्रणा करत आहेत.

“तक्रारदारावर दबाव असू शकतो!”: रोहित पवार

या नव्या दाव्यानंतर संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे झाले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

दबावाचा संशय: “तक्रारदार व्यक्ती आज काय बोलतोय, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. तो व्यक्ती कोण आहे? तो काय सीआयडी किंवा ईडीचा अधिकारी आहे का? जसे सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घ्यायला लावून त्यांच्यावर दबाव आणला गेला, तसाच प्रकार इथेही असू शकतो,” अशी शक्यता रोहित पवार यांनी वर्तवली.

पुराव्यांच्या आधारे चौकशीची मागणी: “हा विषय आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असून त्यांच्यात नकारात्मक चर्चा सुरू आहे. आमच्याकडे जे पुरावे आले आहेत, त्या आधारावर सरकार आणि आयोग आता काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.

दरम्यान, तक्रारदाराच्या या नव्या दाव्यामुळे ‘पेपरफुटी’ झाली होती की केवळ ‘बनावट तक्रार’ करून आयोगाची दिशाभूल करण्यात आली? याचे उत्तर आता MPSC च्या अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या वाचा..

MPSC पेपरफुटीच्या दाव्यावरून रोहित पवार आक्रमक:सरकारला 10 दिवसांचा अल्टीमेटम; म्हणाले- कारवाई न झाल्यास दिल्लीसारखे आंदोलन उभारू

राज्यात टीईटी, पोलीस भरती आणि नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आले असतानाच, आता थेट ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (MPSC) पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. MPSC मार्फत घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’ भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘महाराष्ट्रातील पेपर लीकचा काळा अध्याय’ या नावाने पत्रकार परिषद घेत पवारांनी या कथित पेपरफुटीचे धागेदोरे, व्हॉट्सॲपवरील पुरावे आणि थेट MPSC च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास येत्या १० दिवसांत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. सविस्तर वाचा

पेपरफुटीचं हे रॅकेट कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरूय?:MPSC ‘औषध निरीक्षक’ भरतीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात

देशभरात ‘नीट’ परीक्षेचा वाद पेटलेला असतानाच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ‘औषध निरीक्षक’ भरतीत पेपरफुटी आणि गुणांमध्ये फेरफार झाल्याच्या दाव्याने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उमेदवारांनी या कथित गैरव्यवहाराचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि डिजिटल पुरावे आयोगाला सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांच्यानंतर आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुराव्यांसह तक्रारी समोर येऊनही सरकार शांत का? असा संतप्त सवाल करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.