Headlines

Mumbai NSCI Club Drug Party: Youth Dies, One Critical



​मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय (NSCI) क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार

.

संगीत कार्यक्रम रंगात आलेला असतानाच हा प्रकार घडल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीत कार्यक्रम सुरू असतानाच संबंधित व्यक्तीची प्रकृती अचानक खालावली. त्याला तातडीने प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अनपेक्षित घटनेमुळे कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या हजारो संगीतप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

‘ड्रग्ज’ कनेक्शनचा पोलिसांना संशय?

सध्या या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. विशेषतः या संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांचे सेवन झाले होते का? आणि मृत व्यक्तीने काही अंमली पदार्थांचे सेवन केले होते का? या शंकेच्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास चक्र फिरवली आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील अशाच एका मोठ्या संगीत कार्यक्रमात ड्रग्जच्या संशयावरून मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत.

सीसीटीव्ही आणि आयोजकांची चौकशी सुरू

“शवविच्छेद अहवाल आणि इतर वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष आल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, आयोजकांकडील नोंदी आणि प्रत्यक्षदर्शी उपस्थितांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. कोणताही घाईघाईने निष्कर्ष न काढता सर्व पुराव्यांची काटेकोर तपासणी करूनच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *