NEET-UG परीक्षेतील कथित गोंधळ अजून शांत होत नाही तोच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. नागपूरमधील रहिवासी आणि NEET ची तयारी करणाऱ्या अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला 21 जून रोजी होणाऱ्या फेर
.
हॉल तिकीट पाहताच विद्यार्थी ढसाढसा रडला विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद तालिब यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “काल दुपारी ४ वाजता जेव्हा आम्ही हॉल तिकीट डाऊनलोड केले, तेव्हा परीक्षा केंद्र म्हणून अबुधाबीमधील एका शाळेचे नाव पाहून आम्हाला मोठा धक्का बसला. आम्ही पर्यायांमध्ये असे कोणतेही केंद्र निवडले नव्हते. हा धक्का सहन न झाल्याने माझा मुलगा काल प्रचंड रडला आणि त्याने परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच्या आईने त्याची समजूत काढली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माझ्या मुलाकडे पासपोर्ट देखील नाही, मग तो परदेशात कसा जाणार?”
NTA कडून नवीन हॉल तिकीट देण्याचे आश्वासन या गंभीर गडबडीनंतर कुटुंबाने तातडीने हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला. त्यांना मेल पाठवण्यास सांगण्यात आले. मेल पाठवल्यानंतर एनटीएकडून फोन आला असून शनिवार (आज) दुपारी ४ वाजेपर्यंत नवीन हॉल तिकीट जारी केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
आता फक्त नागपूर केंद्राचीच मागणी “आम्ही परीक्षेसाठी ३ जिल्ह्यांचे पर्याय दिले होते, परंतु आता या मानसिक त्रासामुळे आमचा मुलगा प्रचंड तणावाखाली आहे. आता दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी आमच्याकडे वेळ उरलेला नाही. त्यामुळे त्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे,” असे हताश वडिलांनी सांगितले. या प्रकरणावरून आता NEET परीक्षेच्या नियोजनावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाचा संबधित बातमी..
‘री नीट’साठी आज NTA ची देशभरात मॉकड्रिल: भारतातील 551 शहरांत केंद्रे, 22.79 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी 2 लाख कर्मचारी तैनात

NEET-UG 2026 च्या पुनर्परीक्षेपूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) शनिवारी देशभरात मॉक ड्रिल करेल. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय एजन्सीजसोबत मिळून मल्टी लेयर सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेत 22.79 लाखांहून अधिक उमेदवार सहभागी होतील. यासाठी भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 5000 हून अधिक परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. NTA नुसार, परीक्षा आयोजित करण्यासाठी 2 लाखांहून अधिक कर्मचारी, 674 सिटी कोऑर्डिनेटर आणि 6,669 निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
NTA नुसार, परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत पेन-अँड-पेपर पद्धतीने होईल. PwD आणि PwBD श्रेणीतील पात्र उमेदवारांना अतिरिक्त वेळ देऊन सायंकाळी 6:20 वाजेपर्यंत परीक्षा लिहिण्याची परवानगी असेल. सविस्तर वाचा