Headlines

रस्ता चुकलेल्या चार वर्षाच्या मुलीचा काही तासात शोध:बार्शी पोलिसांची कामगिरी, पालकांकडे सुखरुप स्वाधीन‎




बार्शी घरातून कोणालाही न सांगता खेळणी आणण्यासाठी बाहेर पडलेली ४ वर्षांची चिमुकली रस्ता चुकली शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांतच या चिमुकलीला सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती अशी शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. बराच वेळ झाला तरी मुलगी घरात न दिसल्याने पालकांची मोठी धावपळ उडाली. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने तिचे वडील बाबासाहेब दगडू मांगडे यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती देत मुलगी शोधण्याची विनंती केली. ४ वर्षांची लहान मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांची पथके तात्काळ वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली. परिसरात शोध घेत असतानाच, टिळक चौक येथे सदर मुलगी पोलिसांना मिळून आली. तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्या आई- वडिलांच्या समोर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने मी खेळणे घेण्यासाठी घरातून बाहेर पडले होते असे सांगितले. मुलगी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी अधिकृत सोपस्कार पार पाडत तिला पालकांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संगप्पा मुळे, राहुल बोंदर व संतोष जाधवर यांनी शोध मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *