इंडूरन्स कंपनीच्या CSR मधून वाघोळा येथे ग्रामविकास प्रकल्प सुरू:नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि तलावातील गाळ काढण्याच्या कामांचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री तालुक्यातील वाघोळा गावात इंडूरन्स कंपनीच्या सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सेवक ट्रस्टच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. काही दिवसांपूर्वी आयोजित ग्रामसभेत गावाच्या विकास…