![]()
मालेगाव विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी (दि.१८) महापालिकेच्या ८४ पैकी ८३ नगरसेवकांनी तहसील कार्यालयातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. एमआयएमचे नगरसेवक आमदार मुफ्ती पुत्र हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने त्यांचे मतदान झाले नाही. दरम्यान, मालेगाव सेक्यूलर फ्रंटच्या इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेसच्या ४३ नगरसेवकांनी लोकशाही वाचविण्यासाठी तानाशाहीविरोधात मतदान केल्याची भूमिका मांडत २२ जूनला लोकशाहीचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. सेक्यूलर फ्रंटची भूमिका मांडताना समाजवादीचे गटनेते मुस्तकिम डिग्नीटी यांनी महायुतीवर टीका केली. उमेदवारावर दबाव आणून माघार घेतली जावू शकते. मात्र, मतदारांवर दबाव आणून त्यांना मतदानापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही. आम्ही विना दबाव लोकशाही वाचविण्यासाठी मतदान केले आहे. महायुती केवळ २५ मतांपुरती मर्यादीत राहिल. निकालाच्या दिवशी परिवर्तन दिसून येईल, असेही डिग्नीटी यांनी सांगितले. प्रतिनिधी | इगतपुरी विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया इगतपुरी तहसील कार्यालयात शांततेत पार पडली. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपरिषदांमधील सर्व नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावत १०० टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इगतपुरी तहसीलदार अभिजित बारावकर यांनी काम पाहिले. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील २ नगराध्यक्षांसह ४५ नगरसेवक असे एकूण ४७ जण भिवंडी येथून समृद्धी महामार्गाद्वारे मतदानासाठी इगतपुरी येथे दुपारच्या सुमारास दाखल झाले. सर्व नगरसेवक एकाच बसमधून मतदान केंद्रावर पोहोचले. त्यानंतर इगतपुरी तहसील कार्यालयात मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. केंद्रावर गर्दी होऊ नये आणि प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी नगरसेवकांना दहा-दहा जणांच्या गटाने मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे कोणतीही अडचण न येता सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्र्यंबक नगर परिषदेचे एकूण २३, इगतपुरी नगर परिषदेचे २४ सदस्य यांनी मतदान केले. गोतस्करीच्या तीन गुन्ह्यांमध्ये फरार असलेला एमआयएमचा गटनेता अब्दूल मलिक मोहंमद युनूस यानेही मतदान केले. मलिक खाली मान घालूनच केंद्रात गेला व बाहेरही पडला. मे महिन्यात गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला का, त्याला मतदानासाठी न्यायालयाने परवानगी दिली होती का, त्याला अटक का केली नाही यासंदर्भात स्थानिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही कुठलीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट झाले. सकाळच्या सुमारास एक संशयास्पद कार पोलिसांनी पकडली. यात ४५ हजार रुपये रक्कम मिळून आले. वाहनात असलेल्या सर्वांचे जाब जबाब घेऊन, पंचनामा करून त्यांना दुपारी सोडून देण्यात आले.
Source link
मालेगावमध्ये 84 पैकी 83 नगरसेवकांचे मतदान:हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने झाले नाही मतदान