Headlines

अर्शद वारसीने मरणासन्न आईला पाजले नाही पाणी:आजही पश्चात्ताप करतात, कधी लिपस्टिक विकली, 'सर्किट'च्या यशाची अपेक्षा नव्हती

14 वर्षांच्या वयात अर्शद वारसी यांनी असे दुःख पाहिले, ज्यामुळे ते वेळेआधीच मोठे झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आईला पाणी दिले नव्हते आणि काही तासांनंतर त्यांचे निधन झाले. या गोष्टीची खंत त्यांना आजही आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि त्यांना शाळा सोडावी लागली. त्यांनी बसमध्ये आणि घरोघरी जाऊन लिपस्टिक विकली, फोटो लॅबमध्ये नोकरी…

Read More

गेटवे ऑफ इंडियावरील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक!:मुंबई बँकेकडून आर्थिक मदत, मंत्री नितेश राणेंची प्रवीण दरेकरांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि हरित पर्यावरणासाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाला गती देण्यासाठी बोट धारकांना मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासंदर्भात मत्स्यव्यवसाय…

Read More

जिद्दीच्या जोरावर सानपवाडीच्या दोन सुपुत्रांची उपनिरीक्षक पदाला गवसणी:आनंदोत्सव केला साजरा, गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात काढली मिरवणूक‎

पाचोड शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर यश नक्की मिळते, हे सानपवाडी (ता. पैठण) येथील कैलास प्रल्हाद जाधव आणि योगेश भगवान मगरे या दोन तरुणांनी सिद्ध केले आहे. पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असताना, खात्यांतर्गत परीक्षेत यश मिळवून या दोघा . कैलास जाधव यांची २०१४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे, तर योगेश मगरे यांची २०१७…

Read More

वर्षातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत मेळघाटातील तेंदूपत्ता हंगाम सुरु:वर्षभराची जमापुंजी गोळा करण्यासाठी आदिवासींचे परिश्रम‎

मेळघाटातील जंगल परिसरात पुन्हा एकदा तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली असून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात जंगलातून तेंदूपत्ता तोडण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराची कमतरता भासत असताना तेंदूपत्ता हंगाम हा अनेक कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. जंगलातून पत्ता गोळा करून त्याचे गठ्ठे तयार करण्यात येत असून प्रती नग ३ रुपये ३० पैसे तसेच ३३० रुपये…

Read More

चारित्र्यवान व व्यसनमुक्त पिढीच देशाची खरी संपत्ती- प्रमोद पोकळे:राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे सुसंस्कार शिबिराचा समारोप‎

‘मोबाइल, सोशल मीडियाच्या युगात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनाधीनतेमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले असून, त्यांना वेळीच सुसंस्कारांचे बाळकडू देणे गरजेचे आहे. अशा शिबिरांमधून घडलेली सशक्त, व्यसनमुक्त चारित्र्यवान नवपिढीच भारताची खरी संपत्ती ठरेल,’ असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रमोद पोकळे यांनी केले. गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप…

Read More

मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा- डॉ. खान:मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशनतर्फे जाहीर सत्कार‎

छत्रपती संभाजीनगर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरे वेगाने घडत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. संयमित, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वागणुकीतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर द्यावा. त्यानेच समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांनी केले. सामाजिक कार्य तसेच राज्यसभेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेडरेशन ऑफ…

Read More

रमेश माटेंनी रायपूरमध्ये 100 किलो वजन उचलले:सत्तराव्या वर्षी दोन सुवर्णपदके पटकावली

नागपूर: पश्चिम नागपूरचे ७० वर्षीय रमेश माटे यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित ‘मिनी इंडियाबुल्स पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यांनी १०० किलो वजन उचलून ही कामगिरी केली. माटे हे पश्चिम नागपूर नागरिक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि रामनगर व्यायामशाळेचे आजीव सभासद आहेत. रामनगर व्यायामशाळेचे वरिष्ठ मल्ल असलेल्या माटे यांनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत दोन…

Read More

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला प्राथमिक विरोध:जातीय जनगणनेनंतरच निर्णय घेण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

पुण्याचे उपमहापौर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे नेते परशुराम वाडेकर यांनी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याला प्राथमिक विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, यामुळे समाजात अंतर्गत फूट निर्माण होऊ शकते. मात्र, जर उपवर्गीकरण करणे अपरिहार्य ठरले, तर ते राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच लोकसंख्येच्या अचूक प्रमाणावर आधारित असावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय…

Read More

विधान परिषद निवडणूक: अर्ज भरण्यास केवळ तीन दिवस शिल्लक:भाजपचे पोटे आज उमेदवारी दाखल करणार, काँग्रेसचा उमेदवार गुलदस्त्यात.

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार प्रवीण पोटे शुक्रवार, २९ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपने प्रवीण पोटे यांना अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था…

Read More

भरधाव क्रुझरची दुचाकीस धडक; एकजण जागीच ठार:पैठणच्या इसारवाडी परिसरात घडला अपघात‎

छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील ईसारवाडी शिवारातील एचपी पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझर वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१२ मे) सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. विष्णू अण्णा बोबडे (६२, रा. वाहेगाव ता. पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू बोबडे हे त्यांच्या दुचाकी (एमएच २० २४२) वरून…

Read More