Headlines

शुभारंभच्या 10 दिवसीय नाट्य कार्यशाळेचा समारोप:कलाकारांनी सादर केली स्वगते, मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

अमरावती येथील ‘शुभारंभ थिएटर्स कल्चरल अँड एज्युकेशनल सोसायटी’ने आयोजित केलेल्या दहा दिवसीय नाट्य कार्यशाळेचा नुकताच उत्साहात समारोप झाला. या सांगता समारंभाला प्रसिद्ध नाट्य अभिनेते प्रसाद खरे आणि ख्यातनाम नाट्य लेखक-दिग्दर्शक अभय नवाथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहा दिवस चाललेल्या या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या सर्व कलाकारांनी समारोप प्रसंगी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यांनी एकापेक्षा एक…

Read More

मोदींचे सर्व पक्षांना पत्र; महिला आरक्षणावर समर्थन मागितले:खरगे यांचा आरोप- निवडणुकीच्या फायद्यासाठी सरकार विधेयक आणत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ला पाठिंबा मागितला. पंतप्रधानांनी लिहिले की, आता वेळ आली आहे की हा कायदा संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लागू केला जावा. त्यांनी लिहिले की, 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिलांसाठी आरक्षणासह घेतल्या जाव्यात. महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व देण्याची इच्छा…

Read More

12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद:मेडिकल स्टोअर्स डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू शकणार नाही, 3 वर्षांचा रेकॉर्डही ठेवावा लागेल

केंद्र सरकारने 12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद केली आहे. आता ही औषधे डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाणार नाहीत. औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने ड्रग्स रूल्स, 1945 मध्ये हा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, ज्या पिण्याच्या औषधांमध्ये इथाइल अल्कोहोलचे प्रमाण 12% पेक्षा जास्त असते आणि जी 30 मिलीलीटरपेक्षा मोठ्या बाटलीत विकली जातात, त्या…

Read More

पावला पावलांवर लपलेला इथं वासनांध साप आहे:बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे; राजकुमार नायकांची कवितेद्वारे व्यथा

दबा धरून बसलेली गिधाडे, कुठपर्यंत विश्‍वास ठेवायचा, नुसते मोर्चे काढून कुठपर्यंत दिवा लावायचा, पावला पावलावर लपलेला इथं वासनांध साप आहे, बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे, या कवितेतून सवना (जि.हिंगोली) येथील कवी राजकुमार नायक यांनी सध्याच्या परिस्थितीची भीषणता मांडली आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी आता बंदुकीचे लायसन मुलींच्या वडिलांना दिले पाहिजे, अशी मागणीही…

Read More

कुर्डुवाडी ट्रॉमाच्या पदनिर्मितीला मंजुरी:तीन उपकेंद्रे पुन्हा दुर्लक्षित, माढ्यात आरोग्य इमारतींचे जाळे; पण कर्मचाऱ्यांअभावी ठरताहेत पांढरा हत्ती‎

माढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर इमारतींचे जाळे उभे राहत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांअभावी या इमारती पांढरा हत्ती ठरत आहेत. शासनाच्या २४ जून रोजीच्या नव्या शासन निर्णयानुसार कुर्डुवाडी . महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांच्या पदनिर्मितीला मंजुरी दिली. यामध्ये कुर्डुवाडी येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या…

Read More

पुणे-बंगळुरू महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक:भीषण अपघातात 2 ठार, 5 जखमी; सातारा शहराजवळील दुर्घटना

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्टसमोरील परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील म्हसवे गावाच्या हद्दीत पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे…

Read More

डॉ. प्रमोद चौधरींची पुणे विद्यापीठाला 75 लाखांची देणगी:'अडव्हांस्ड बायोइकॉनॉमी'साठी उत्कृष्टता केंद्र उभारणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच ‘डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अडव्हांस्ड बायोइकॉनॉमी’ हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांनी या केंद्राच्या स्थापनेसाठी ७५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. हे केंद्र जैव-संसाधनांविषयीचे ज्ञान वाढवून शाश्वत विकास आणि चक्रीय जैव-अर्थव्यवस्था या क्षेत्रांतील संशोधनावर विशेष लक्ष केंद्रित करेल. या केंद्राच्या सुसज्जीकरणाच्या…

Read More

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख:जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील; 2 महिन्यांपूर्वी उप लष्करप्रमुख बनले होते

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारतीय लष्कराचे नवे प्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून नियुक्ती केली आहे. सेठ सध्या उपसेनाप्रमुख (व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ) पदावर कार्यरत आहेत. ते विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील. जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत आहे. त्यांनी 30 जून 2024 रोजी लष्करप्रमुख पदाची…

Read More

सिल्लोड तालुक्यामध्ये टंचाईचे चटके; 21 गावांना 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा:तापमानाचा तडाखा कायम, जलस्त्रोतांची पातळी खालावली

तालुक्यात उन्हाचा कडाका वाढण्यासोबतच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या असून, प्रशासकीय पातळीवर तात्पुरती मलमपट्टी सुरू झाली आहे. चालू आठवड्यापर्यंत तालुक्यातील तब्बल २१ गावांची तहान भागवण्यासाठी २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, तर इतर १३ गावांमध्ये पाण्यासाठी १४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले…

Read More

एन. रंगासामी पाचव्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री:भाजप अध्यक्ष नितीन नवीन शपथविधीला उपस्थित होते; केरळमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

एन. रंगासामी पाचव्यांदा पुडुचेरीचे मुख्यमंत्री बनले आहेत. उप-राज्यपाल कैलाश नाथन यांनी लोक भवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनही उपस्थित होते. रंगासामी यांच्याशिवाय भाजपचे ए नमस्सिवायम आणि एआयएनआरसी नेते मल्लादी कृष्णा राव यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नमस्सिवायम 2021 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते. मागील पुडुचेरी सरकारमध्ये ते…

Read More