Headlines

अटीशर्ती बाजूला ठेवा, शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्या:रोहित पवारांची सरकारकडे मागणी, आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट




राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे यंदाचे वर्ष बळीराजासाठी अत्यंत कठीण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जुलै महिन्यासाठी वर्तवलेला अंदाजही चिंता वाढवणारा आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे,” अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात आज ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, सरकार यावर सकारात्मक मार्ग काढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजाचा दाखला; परिस्थिती चिंताजनक रोहित पवार यांनी ट्विटर एस्सवर पोस्ट करत राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हवामान विभागाने जुलै महिन्याचा जो अंदाज वर्तवला आहे, त्यावरून यंदाचे वर्ष शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असणार हे स्पष्ट दिसतेय. अनेक भागांत अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. “आता अटी-शर्ती नको, थेट दिलासा द्या!”
शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मोठ्या आधाराची गरज आहे. त्यामुळे सरकारने कुठल्याही जाचक अटी आणि शर्ती न लावता, तात्काळ विनाअट सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, हीच सरकारला नम्र विनंती आहे.” मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष
या गंभीर विषयावर केवळ मागणी न करता रोहित पवार आज थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. “या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा आणि कर्जमाफीचा सकारात्मक मार्ग नक्कीच निघेल,” अशी आशाही त्यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे. विधीमंडळ अधिवेशन सुरू असतानाच रोहित पवार यांनी हा मुद्दा लावून धरल्याने आता सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा.. नायराचे पेट्रोल ₹5, डिझेल ₹3 ने स्वस्त:कमर्शियल सिलेंडर ₹180 ने स्वस्त, विनातिकीट रेल्वे प्रवास केल्यास दुप्पट दंड; 1 जुलैपासून 7 बदल आज, १ जुलैपासून व्यावसायिक सिलिंडर्सच्या दरात सरासरी १८० रुपयांची कपात झाली आहे. आता दिल्लीत हे सिलिंडर २,९३० रुपयांना मिळेल. त्याचबरोबर, पेट्रोल पंपांवर प्रति वाहन दररोज केवळ २०० लिटर डिझेल भरण्याबाबतची मर्यादाही मागे घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, पासपोर्ट मिळवणे किंवा तो पुन्हा जारी करून घेणे आता पूर्वीपेक्षा अधिक महाग झाले आहे; कारण सामान्य पासपोर्टचे शुल्क १,५०० रुपयांवरून वाढवून २,५०० रुपये करण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *