ज्या समाजात अभिजीत दिपकेंचा जन्म झाला, त्या समाजाचे तुम्ही जर होऊ शकत नाही, तर या देशाचे कसे होणार? स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दिपके मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तुम्ही दिल्लीत कसे आंदोलन केले, हे सर्वांना माहीत आहे. महारा
.
सचिन खरात पुढे म्हणाले की, दिपकेंना समाजातील आई-वडील दिसत नाहीत, समाजाबद्दल आपुलकी नाही आणि त्यांचे अश्रूही दिसत नाहीत. ज्या व्यक्तीला कोणाबद्दलही आपुलकी नाही, तो कोणाचाच होऊ शकत नाही. भारतामध्ये क्रूर शासक म्हणून जसे औरंगजेबाचे नाव समोर येते, तसेच दिपके हा औरंगजेबाचीच एक आवृत्ती आहे. अशा व्यक्तीपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
दिपकेंना त्या आंदोलकांची भेट घ्यावी वाटली नाही
अभिजीत दिपकेंच्या दिल्लीमधील आंदोलनावेळी 400 जण जखमी झाले होते, ज्यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि काही विद्यार्थी होते. मात्र, या क्रूर अभिजीत दिपकेला त्या जखमींना कधीही भेटायला जावेसे वाटले नाही, असा संताप खरात यांनी व्यक्त केला. दिपके लोकांना फक्त भावनिक करतात, पण आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. त्या विद्यार्थ्यांचे आई-वडील आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेण्याचे सोडून दिपकेंनी मुंबईत पर्यटन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हे ही वृत्त वाचा
अभिजित दिपके साहिल वाकोडे प्रकरणावर का बोलत नाहीत?:तो गद्दार अन् दलितविरोधी, हे केजरीवालांच्या विचारधारेचे पिल्लू- सचिन खरात

अभिजीत दिपके सांगत होते मी दलित आहे, मला आश्चर्य वाटले की आयआयटी बॉम्बेमध्ये एक दलित मुलगा आत्महत्या करतो त्या प्रकरणावर हे काही बोलत नाही. हे दलित आहेत ना? मग का शांत बसले हा माझा प्रश्न आहे? असा सवाल साहिल वाकोडे प्रकरणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी करत दिपकेंवर निशाणा साधला आहे.
सचिन खरात म्हणाले की, अभिजीत दिपके समजाला वळून पाहत नाही तो गद्दार आहे. तो दलित विरोधी आहे हे माझे पहिले मत आहे. साहिल वाकोडे या दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी अभिजीत दिपकेमूग गिळून शांत बसले असून त्यांनी याप्रकरणी कोणतीही मोर्चेबांधणी किंवा आंदोलन केले नाही.परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड झाली आणि दलित विद्यार्थ्यांना पाण्यासाठी त्रास दिला जात असताना दिपकेकुठे लपून बसले होते? असा सवाल त्यांनी केला आहे. दलितांवर होणारे अन्याय अत्याचार त्याला दिसत नाही का? असेही खरात यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर