![]()
राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला आहे. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. आज पुरंदर तालुक्यातील ‘परिंचे’ गावात त्यांनी गावकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या दौऱ्यात शरद पवार यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या १०० टक्के कर्जमाफीसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. परिंचे गावात गावकऱ्यांनी मांडल्या व्यथा परिंचे गावात आयोजित ‘दुष्काळ पाहणी दौरा व शेतकरी संवाद’ कार्यक्रमात स्थानिक नेते, शेतकरी आणि महिलांनी आपल्या समस्या शरद पवारांसमोर मांडल्या. पाणी आणि सिंचन: गावात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई आहे. ‘पुरंदर उपसा जलसिंचन योजना’ सतत बंद पडते ती सुरळीत करावी आणि ‘गुंजवणी प्रकल्पा’चे पाणी पुरंदरला मिळावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. विमानतळ आणि रोजगार: नवीन येऊ घातलेल्या पुरंदर विमानतळासाठी गुंजवणीचे पाणी वळवले जाऊ नये, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जेजुरी एमआयडीसीचा (MIDC) विस्तार करण्याची मागणी करण्यात आली. शेतीचे नुकसान व हमीभाव: दुष्काळामुळे भात, बाजरी, सोयाबीन आणि उसाचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा आणि सोमेश्वर कारखान्याने फेब्रुवारीपर्यंत ऊस तोडणी पूर्ण करावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. शिक्षण आणि महिलांचे प्रश्न: गावातच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंत CBSE शाळा सुरू करावी. तसेच, पाण्यासाठी महिलांची पायपीट थांबावी यासाठी पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी भावनिक साद महिलांनी घातली. १००% कर्जमाफी आणि सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकल्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरत विविध मागण्या मांडल्या. ते म्हणाले, “सध्या पाऊस पडला नसल्याने माणसं आणि गुरं-ढोरं कशी जगवायची, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मी २७ तारखेला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुरंदरसह अन्य वंचित तालुक्यांत पूर्णपणे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.” मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार या सर्व मागण्या आणि जनतेच्या भावना आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्या आहेत, असे पवारांनी स्पष्ट केले. “लोकांच्या भावना काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः बांधावर आलो आहे. तुम्ही मांडलेले हे सर्व मुद्दे घेऊन मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि यातून निश्चितच मार्ग काढला जाईल,” असा मोठा आधार शरद पवार यांनी बळीराजाला दिला आहे. हेही वाचा.. महाराष्ट्रातील आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट: पिकांचे 20% सर्वेक्षण करण्याचे आदेश, कर्जवसुलीत सक्तीला मनाई राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता दुष्काळाची तीव्रता जाणवत असलेल्या आणखी 19 तालुक्यांकडे राज्य सरकारचे लक्ष लागले आहे. या तालुक्यांमध्ये पिकांची स्थिती आणि प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने सर्वेक्षण आणि ग्राउंड ट्रथिंग करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यामुळे या 19 तालुक्यांनाही दुष्काळी सवलती मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा
Source link
शरद पवारांचा दुष्काळी भागाचा पाहणी दौरा:म्हणाले- शेतकरी संकटात, सरकारने तातडीने मदत करावी; कर्जमाफी, वीजबिल माफीसह 5 प्रमुख मागण्या