Headlines

प्रदीप पूर्णेकरांचा खून पचवू देणार नाही:अमित शहांमुळे महाराष्ट्रात गुंडाराज, त्यांच्या अंगावर पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे फेकले पाहिजेत- संजय राऊत




आम्ही प्रदीप पूर्णेकरांचा खून पचवू देणार नाही. अमित शहा यांनी भारतामध्ये माफिया राज्य आणले असून महाराष्ट्रात गुंडा राज आणले आहे. एक नंबरचे गुंड आणि टोळीवाले यांना पक्षात घेतले असून भाजपला गुंडांचा पक्ष बनवले आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ठाण्यामधील गुंडाराजला अमित शहा जबाबदार आहेत, पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे शहा ज्यावेळी इथे येतील तेव्हा त्यांच्या अंगावर फेकले पाहिजे. अमित शहा या शैतानीवृत्ती विरोधात देशात एक रोष आहे. संजय राऊत म्हणाले की, अमित शहा यांनी कार्यकर्ते नाही तर दुसऱ्यांचे रक्त पिणारे शैतान उभे केले आहेत. पूर्णेकरांचा खून त्यांच शैतानशाहीतून झाला आहे. मनपा निवडणुकीपासून हा वाद सुरू आहे. या हत्येची पहिली जबाबदारी ठाणे पोलिसांची आहे. या हत्येमध्ये पहिला गुन्हेगार ठाणे पोलिस दल आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. पोलिस आयुक्त ठाण्याच्या पालकमंत्र्यांचे नोकर आहे का? ठाण्याचे पोलिस गृहमंत्र्यांचे काही ऐकत नाही का? गणेश नाईक यांनी ठाण्याचे नेतृत्व केले पाहिजे, आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू. ..तर एसआयटीचा फायदा होईल संजय राऊत म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली याबद्दल आम्ही आभारी आहोत. एसआयटीने कोणत्याही दबावाखाली न येता पारदर्शक तपास केला तरच तपासाला अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी जर एसआयटीमध्ये जर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश केला असेल तर ते कोणाच्या तरी मेहरबानीमुळे 10 ते 12 वर्षे ठाण्यातच आहेत. ते कोणाचे तरी एजंट म्हणून काम करत आहेत. जे कोणत्यातरी गटाचे कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस प्रदीप पूर्णेकर यांच्या खूनाचा तपास योग्य दिशेने होईल याची खात्री कशी देऊ शकतात. मिनाक्षी शिंदेंना अटक व्हावी संजय राऊत म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू ही पूर्णपणे राजकीय हत्या आहे. ठाण्यातील लेडी डॉन पूर्णेकर यांच्यासंदर्भात कोणत्या भाषेत धमक्या देते आहे हे आपण सर्वांनी पाहिले. घरात गुंड घुसवण्याची भाषा आहे. माझ्या नादाला लागाल तर सीपीला सांगून सरळ करेल अशी धमकी दिली आहे. ठाण्यामधील मिनाक्षी शिंदे अशा धमक्या पूर्णेकरांना देत होत्या. गृहमंत्र्यांनी त्यांना काही अधिकार दिले आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. पूर्णेकरांच्या हत्येच्या षड्यंत्रामागील सूत्रधार मिनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे हेच आहेत, त्यांना अटक केली पाहिजे. एसआयटी आणि ठाणे पोलिस आयुक्तांनी कितीही नव्या कहाण्या समोर आणल्या तरी त्यावर आमचा विश्वास नाही. पण त्या हत्येचे मुख्य सूत्रधार बाहेर आहे. हे ही वृत्त वाचा सत्तेला ‘नाही’ म्हणण्याची ताकद हीच गांधीजींची खरी देणगी:सत्ताधाऱ्यांना गांधीजी फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत- राज ठाकरे
सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं… आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्या ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात, अशी पोस्ट महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *