![]()
पालघरमधील साधू हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणे, यालाच सैतानी वृत्ती म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केल्याबद्दल नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणे आणि पत्रकारांना अटक करणे, याला सैतानी वृत्ती म्हणतात, असे भाजप नेते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नारायण राणे आणि मोहित कंबोज यांचे घर पाडण्याचे प्रयत्न करणे याला सैतानी वृत्ती म्हणतात. ‘मातोश्री-2’ बांधण्यासाठी मराठी माणसांचा पैसा खाणे याला सैतानी वृत्ती असे म्हणतात, आणि ती उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची आहे, असे त्यांनी आरोप केला. नवनाथ बन म्हणाले की, आंदोलनात आपले गुंड घुसवत पत्रकारांना मारहाण करायची आणि विरोधात भूमिका घ्यायची, हे रोहित पवारांचे षड्यंत्र काल उघड झाले आहे. काही पत्रकार आपल्याला प्रसिद्धी देत नाहीत, या आकसापोटी रोहित पवारांच्या गुंडांनी पत्रकारावर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होता, असे आता सांगितले जात आहे. मात्र, ज्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, तो सिद्धांत पाचंगे नावाचा कार्यकर्ता रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. रोहित पवारांनी गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करून घेतली, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे. कोणालाही सोडणार नाही नवनाथ बन पुढे म्हणाले की, संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही; शहा हे देशाचे नेतृत्व करतात. गुंडांच्या टोळीचा विषय असेल तर, कालपर्यंत ठाण्यात हे सगळे लोक तुमच्यासोबत होते, तेव्हा काय हे साधूसंत होते का? तुमच्यासोबत होते तेव्हा हे सर्व लोक चांगले होते आणि आता एकनाथ शिंदेंसोबत गेले तर गुंडांची टोळी झाली का? ठाण्यात जो प्रकार घडला, तो अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून एसआयटी (SIT) स्थापन केली आहे. यामध्ये जे लोक दोषी असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडले जाणार नाही. ठाकरे गुंडांच्या टोळीचे म्होरके नवनाथ बन म्हणाले की, गुंडांची टोळी काय असते, हे उद्धव ठाकरेंना जाऊन विचारले पाहिजे, असे सांगत बन म्हणाले की, जेव्हा मविआचे सरकार होते, त्यावेळी रोज 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देणारी गुंडांची टोळी होती. गुंडांच्या टोळीचे म्होरके हे उद्धव ठाकरे आहेत. मविआच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात गुंडांची टोळी सुरू करण्यात आली होती आणि त्याचे नेतृत्व मातोश्रीवर बसून उद्धव ठाकरे करत होते. अमित शहा हे लोहपुरुष असून उद्धव ठाकरे हे गुंडांच्या टोळीचे म्होरके आहेत. मविआच्या काळात काय घडले? नवनाथ बन म्हणाले की, मविआच्या काळात अनिल देशमुख काय करत होते? 100 कोटींची वसुली कशी होत होती? आरोपींना बेड्या ठोकणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याआधी महाविकास आघाडीने आपला इतिहास तपासावा. तुमच्या सरकारच्या काळात काय घडले, हे तपासा. उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचा इतिहास विसरून विरोधकांनी देवाभाऊंवर टीका करू नये. देवेंद्रजींच्या सरकारमध्ये दोषींना पाठीशी घातले जाणार नाही; आरोपी कोणताही असो, कारवाई होणारच, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. हे ही वृत्त वाचा प्रदीप पूर्णेकरांचा खून पचवू देणार नाही:अमित शहांमुळे महाराष्ट्रात गुंडाराज, त्यांच्या अंगावर पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे फेकले पाहिजेत- संजय राऊत
आम्ही प्रदीप पूर्णेकरांचा खून पचवू देणार नाही. अमित शहा यांनी भारतामध्ये माफिया राज्य आणले असून महाराष्ट्रात गुंडा राज आणले आहे. एक नंबरचे गुंड आणि टोळीवाले यांना पक्षात घेतले असून भाजपला गुंडांचा पक्ष बनवले आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ठाण्यामधील गुंडाराजला अमित शहा जबाबदार आहेत, पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे शहा ज्यावेळी इथे येतील तेव्हा त्यांच्या अंगावर फेकले पाहिजे. अमित शहा या सैतानीवृत्ती विरोधात देशात एक रोष आहे.वाचा सविस्तर
Source link
रोहित पवारांच्या गुंडांनीच पत्रकारांवर हल्ला केला:पालघर साधू हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणं हीच सैतानी वृत्ती- नवनाथ बन