Headlines

मीरा-भाईंदर घोटाळा:6 हजार कोटींच्या भूखंडावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली, राजकीय फायद्यासाठी यंत्रणांचा वापर खपवून घेणार नाही- बावनकुळे

मीरा-भाईंदर येथील ६ हजार कोटी रुपये मूल्याची २५४ एकर सरकारी जमीन खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत, सरकार जमीन वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी मुंबईत सांगितले की, “राज्यावर कर्जाचा…

Read More

निर्णायक पाऊल:“डिजिटल गुंडागर्दी’ रोखण्यासाठी राज्य सरकारचा नवा कायदा येणार, 3 महिन्यांत तयार होणार नव्या कायद्याचा मसुदा

सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अमर्याद गैरवापर आणि त्यातून जाणीवपूर्वक केले जाणारे डिजिटल चारित्र्यहनन रोखण्यासाठी राज्य सरकारने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲप यांसारख्या व्यासपीठांवर पुराव्याशिवाय अफवा पसरवून कुणाचीही बदनामी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नव्या कठोर कायद्याचा मसुदा तयार करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेचे गांभीर्य ओळखून राज्याचे पोलिस…

Read More

पुण्यामध्ये ब्यूटी पार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून:घटनेनंतर आरोपी पसार, मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ आढळला

ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोपी पसार झाला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. . आफरीन सलीम पठाण (२९, सध्या रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत आफरीनची लहान बहीण अरबिना सय्यद (२४, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ…

Read More

जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण, अमरावतीकरांना आज दुपारनंतर पाणी:सिमेंटऐवजी लोखंडी पाईप बसवला, रात्रभर सेटिंग, सकाळी टेस्टिंग

अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. डवरगाव एमआयडीसी गेटजवळ फुटलेला पाईप बदलण्यात आल्याने रविवार दुपारनंतर शहराला पाणी मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ने दिली आहे. सिमेंटच्या पाईपऐवजी लोखंडी पाईप बसवण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर पाईपच्या सेटिंगसाठी रात्रभर वेळ देण्यात आला. रविवार सकाळपासून त्याची चाचणी (टेस्टिंग) घेतली जाईल. चाचणी…

Read More

मेळघाट विकासासाठी 'मिशन 28' ला गती:आरोग्य, पोषण सुधारण्यावर भर; समन्वयातून परिणाम साध्य करण्याचा निर्धार

मेळघाटच्या विकासासाठी आणि आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘मिशन २८’ ला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. सीईओ गांधी यांनी आज दुपारी सर्व खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मेळघाट क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. आरोग्य, पोषण, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये…

Read More

जिल्हाधिकारी येरेकर यांनी चिखलदरा विकासकामांचा घेतला आढावा:मडकी येथे पर्यटन आणि जलसंधारणावर भर देण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. मडकी येथे त्यांनी सिमेंट नाला बांधकामाचा आढावा घेतला आणि सर्व कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मडकी परिसराला निसर्गाचे कोंदण लाभले असून, ते अधिक सुशोभित करून पर्यटकांना आकर्षित करावे, असे सांगितले. यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त…

Read More

भावेश भाटिया देणार उद्योगाचे धडे:नेत्रहीन उद्योजक अमरावतीत, उद्या सांस्कृतिक भवनात कार्यक्रम

नेत्रहीन उद्योजक भावेश भाटिया ११ मे रोजी अमरावतीकरांना उद्योग, व्यक्तित्व विकास आणि स्वप्नपूर्तीसाठी बहुमोल टिप्स देणार आहेत. शाश्वत कन्सेप्ट स्कूलतर्फे आयोजित हा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. प्रयास सेवांकुर संस्थेचे प्रमुख डॉ. अविनाश सावजी यांनी सांगितले की, भाटिया यांनी आपल्या आईच्या प्रेरणेने ‘तुम्ही जग पाहू शकत नसाल तर काय…

Read More

अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी पुनर्परीक्षा 14 मे रोजी:विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्राधिकारिणीने घेतला निर्णय

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील काही अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षा १४ मे रोजी होणार आहेत. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर विद्यापीठाच्या प्राधिकारिणीने हा निर्णय घेतला आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परीक्षा गुरुवारी, १४ मे रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना तक्रारी होत्या, ज्याची दखल घेऊन विद्यापीठाने पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला….

Read More

जिल्हा परिषदेच्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण:बदली झालेल्या शिक्षकांना जनगणना काम पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ४५ पैकी ४४ अतिरिक्त विषय शिक्षकांचे यशस्वीपणे समायोजन केले आहे. या शिक्षकांना बदली होऊनही देशासाठी महत्त्वाचे असलेले जनगणना कार्य पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही समायोजन प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. या प्रक्रियेत एकूण…

Read More

डॉ. अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान:नितीन गडकरी म्हणाले, जगाला वाचवण्यासाठी शाश्वत मूल्यांची गरज

पुणे: वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ उद्योगपती आणि फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना गडकरी यांनी, विचार भिन्नता ही समस्या नसून विचारशून्यता ही खरी समस्या असल्याचे मत व्यक्त…

Read More