NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात आणि राज्यात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्र
.
गुन्हे आणि नोटिसा तत्काळ मागे घ्या
जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणाले, परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्थेविरोधात न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणे लोकशाहीला शोभणारे नाही. मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे आणि बजावण्यात आलेल्या नोटिसा तत्काळ मागे घ्याव्यात.
सरकारकडून शब्दाचे उल्लंघन
लोकशाही मार्गाने केलेल्या या आंदोलनादरम्यान सरकारने आश्वासन दिले होते की, विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. या आश्वासनावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, आता पोलिसांमार्फत विद्यार्थ्यांची धरपकड सुरू असून, हा विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा भंग आणि फसवणूक आहे.
खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई अपेक्षित
ज्यांनी परीक्षेच्या पवित्र व्यवस्थेशी खेळ केला आणि पेपरफुटीसारखा गंभीर गैरप्रकार केला, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्याऐवजी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच दडपशाही केली जात आहे, ही अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी बाब आहे.
बिहार आणि आसामच्या धर्तीवर परिपत्रक काढावे
बिहार आणि आसाम राज्य सरकारांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याचे अधिकृत परिपत्रक काढले आहे. महाराष्ट्र सरकारनेही या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून याच धर्तीवर परिपत्रक काढावे आणि सरकारने दिलेल्या आश्वासनाची प्रामाणिक अंमलबजावणी करावी.
‘सूडबुद्धीने कारवाई नको’
महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील भूमिका घेणे ही सरकारची जबाबदारी आहे, याची आठवण जयंत पाटील यांनी पत्रातून करून दिली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना देण्याची नम्र विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…
3 महिन्यांत 21 हजारांवरून थेट टॉप 100 मध्ये!:MPSCच्या ‘त्या’ तीन विद्यार्थ्यांच्या निकालाने खळबळ; मेहबूब शेख यांचे गंभीर आरोप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील संशयाचे धुके अधिकच गडद झाले आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच आक्रमक भूमिका घेतली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी या परीक्षेतील तीन उमेदवारांच्या निकालांची आकडेवारीच जाहीर करत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने झालेल्या दोन परीक्षांमध्ये एकाच विद्यार्थ्याच्या रँकमध्ये 21 हजारांवरून थेट पहिल्या शंभरात झालेली झेप संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेहबूब शेख यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी