Headlines

पुणे प्रदूषण वाढले: RMC, हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलवणार:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची घोषणा, नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णय

पुणे शहराच्या वायू प्रदुषणात वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात अनेक भागात खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी प्लांटस् , डांबर प्लांटस् (हॉटमिक्स प्लांट) आहेत. यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्रामुख्याने महापालिकेचे आरएमसी प्लांट आणि डांबर प्लांट शहराबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने काम करावे. तसेच शहरात प्रदूषण नियामक मंडळाच्या…

Read More

पुण्यात 'लिंगभाव समावेशन अन् कौशल्य विकास' युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन:महिलांना उदयोन्मुख तंत्रज्ञानात आघाडीवर ठेवणे हेच उद्दिष्ट- केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते पुणे येथे ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन करण्यात आले. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) येथे आयोजित ‘विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा हा एक भाग होता. या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला…

Read More

TMC 31 जागांवरील निकालांविरुद्ध सुप्रीम कोर्टात पोहोचली:म्हटले- येथे विजयाचे अंतर SIR-मत कपातीपेक्षा कमी; कोर्ट म्हणाले- नवीन याचिका दाखल करा

सर्वोच्च न्यायालयात टीएमसीने दावा केला की, बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 31 जागांवर भाजप आणि टीएमसी यांच्यातील हार-जीतचे अंतर एसआयआरमध्ये वगळलेल्या मतांपेक्षा कमी आहे. सोमवारी टीएमसीचे खासदार आणि वकील कल्याण बॅनर्जी यांनी ही बाब न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मांडली. खंडपीठाने सांगितले की, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर नेते बंगालमध्ये झालेल्या स्पेशल…

Read More

बुलढाणा मेडिकल कॉलेजला राजमाता जिजाऊंचे नाव:राज्य शासनाचा मोठा निर्णय; राजमातांच्या जन्मभूमीचा आणि स्मृतींचा गौरव

बुलढाण्यातील 100 विद्यार्थी क्षमता आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे नामकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून या नामकरणाला मंजुरी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असल्याने, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला…

Read More

13 हजारांची भाड्याची खोली अन् 30 कोटींचा 'कारभार':अंधेरीत मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, गुजरातचा फरार तस्कर अटकेत

मुंबईतील अंधेरी परिसरात एका अत्यंत साध्या भाड्याच्या खोलीतून चालणाऱ्या कोट्यवधींच्या अंमली पदार्थांच्या काळ्या व्यवसायाचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीत दरमहा २५ ते ३० कोटी रुपयांचे ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. खार पोलिसांनी गस्तीदरम्यान केलेल्या एका कारवाईतून हे मोठे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणी…

Read More

हिंगोलीत महागाईच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन:गॅस अन् जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल'ने आंदोलनाचा इशारा

केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवून महागाईच्या खाईत लोटले आहे, असा घणाघात करत हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात उबाठाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, शेतकरी-युवकांचे प्रलंबित प्रश्न, आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात चक्क रस्त्यावर स्वयंपाक करत ‘उबाठा’ च्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. तर मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन…

Read More

Kerala Sabarimala Temple Women Entry Ban LIVE Update; Supreme Court TDB

Marathi News National Kerala Sabarimala Temple Women Entry Ban LIVE Update; Supreme Court TDB | Hindu Beliefs नवी दिल्ली38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळमधील सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात पाचव्या दिवसाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट राजीव धवन यांनी न्यायालयाला सांगितले की, श्रद्धा किंवा विश्वास वेळेनुसार नेहमी बदलत राहतात. हा बदल केवळ कोणताही कायदा बनल्याने…

Read More

केरळममध्ये दीड वर्षाच्या मुलाचा मारहाणीमुळे मृत्यू:लाइटर-सिगारेटने पाय जाळले, शरीरावर 51 जखमांचे निशाण, आई आणि लिव्ह-इन पार्टनरला अटक

केरळममधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील नेडुमंगड येथे सततच्या शारीरिक छळाने आणि मारहाणीमुळे दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलाची आई अखिला (२४) आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर अश्कर (३१) यांना ३१ मे रोजी अटक केली आहे. मुलाचे नाव अर्शित होते. आरोपी अश्कर २९ मे रोजी संध्याकाळी मुलाला गंभीर अवस्थेत तिरुवनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेला होता. त्याने…

Read More

बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक राजधानीचे वैभव: उल्हास पवार:58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व महोत्सवाचे आयोजन, मान्यवरांचा गौरव

बालगंधर्व रंगमंदिर हे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले हे रंगमंदिर आता केवळ शहराचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी काढले. बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने, अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत, बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या…

Read More

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार आणि आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. ते आता शिवसेनेचे ‘सहयोगी सदस्य’ म्हणून काम करणार…

Read More