Headlines

माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची पक्षातर्फे गुळतुला:अमरावतीत गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वाटप




अमरावती येथे माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ‘गुळतुला’ करण्यात आली. या प्रसंगी गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वाटपही करण्यात आले. हा कार्यक्रम स्थानिक गौरक्षण येथे काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. ॲड. ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व वंचित महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले आणि यशोमती ठाकूर यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत आणि मनपाचे विरोधी पक्षनेते तथा माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला माजी खासदार अनंतराव गुढे, शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे व अनिल अग्रवाल, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, संजय वाघ, विनोद मोदी, आनंदबाबू भामोरे, हरिभाऊ मोहोड, नगरसेवक प्रशांत महल्ले, विक्की वानखडे, प्रा. संजय शिरभाते व धीरज हिवसे, नगरसेविका अनिता काळे, लुबना तनवीर, राजश्री जठाळे, मालती गवई, अर्चना आत्राम, आस्मा फिरोज खान, सुनीता भेले व ललिता रतावा यांच्यासह काँग्रेस कमिटीचे विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *