अनियंत्रित ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली:पेट्रोलपंप जलमय, अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट
गुरुवारी सकाळी नांदगाव पेठ येथील अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ एका अनियंत्रित ट्रकच्या धडकेने अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट निर्माण झाले आहे. सकाळी साडेनऊ वाजता डिझेल भरण्यासाठी येत असलेल्या यूपी ७८ डीटी ४५७७ क्रमांकाच्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट…