![]()
हतनूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्न कृषि महाविद्यालय, खंडाळा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जनजागृती व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी सोमवारी चापानेर गावाला भेट दिली. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील कृषी व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन केले होते. या भेटीदरम्यान गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत ग्रामीण जनजागृती व कार्यानुभव कार्यक्रमाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांची गावातील कार्यपद्धती तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गावातील प्रमुख पिके, पाणी व्यवस्थापन, हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आणि आधुनिक शेती पद्धती याविषयी खंडाळा कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी चापानेर गावाला भेट दिली. शेतांना भेट देऊन पीक परिस्थितीचा आढावा कृषिदूतांनी गावातील काही शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतपातळीवरील अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व अनुभवाचे आदान-प्रदान होण्यास मदत होणार असल्याचे मत कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रदीप हांगे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमांतर्गत कृषिदूत पुढील सहा महिने गावामध्ये राहून विविध कृषी उपक्रम राबविणार असून, शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रम कृषी महाविद् यालयाचे प्राचार्य डॉ. जी.के. बहुरे, समन्वयक प्रा. भुसणार, प्रशासकीय अधिकारी टी.बी. नगरे यांच्या मार्गदर शनाखाली राबविण्यात येत आहे. सहभागीमध्ये बी.एस. बाफना, एम.टी. बागुल, ए.एस. बोडखे, ओ.एस. घुटे, एस.एम. जाधव, एस.आर. जोपाळे, वाय.एस. साळवे, एस.बी. शिंदे, एस.एस. शिरसाठ आदी सहभागी होते.
Source link
खंडाळा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चापानेरला दिली भेट:कृषी व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्यांचाविद्यार्थ्यांना मिळाला अनुभव