![]()
अमरावती पंचतारांकीत एमआयडीसीतील पी.एम.मित्रा टेक्स्टाइल पार्कमध्ये वस्त्रोद्योगांसाठी आता थेट पद्धतीने भूखंड वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. आधी ई-निविदेद्वारे भूखंडांचे वितरण केले जायचे. आता ही पद्धत बंद केली आहे. जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला गती देण्यासोबतच रोजगारांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पी.एम.मित्रा टेक्स्टाइल पार्कमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रति चौरस मीटर जागेचे मुल्य ५९० रुपयांपर्यंत आधीच कमी केले आहे. यामुळे येथे मोठया प्रमाणात वस्त्रोद्योग निर्मात्या कंपन्या येतील. परिणामी हा देशातील मोठा टेक्सटाइल हब बनेल हा देखील यामागील मुख्य उद्देश आहे. ई-निविदा प्रक्रिया ही किचकट व कठिण होती. यात जो जमिनीचे जास्तीत जास्त मुल्य देईल, त्याला भूखंड दिला जायचा. मात्र, यासाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव कंपन्यांना करावी लागायची. ही प्रक्रिया सुलभ नसल्याने अनेक कंपन्या भूखंड मिळवण्याचा प्रयत्न करायच्या नाहीत. म्हणून थेट अर्ज मागवून भूखंड वितरण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त वस्त्रोद्योग निर्मात्या कंपनी येथे उर्वरित. पान ४ ^एमआयडीसी इंडिया डॉट ओआरजीवर मिलाप नावाचे पोर्टल असून , ज्यांनी पी.एम.मित्रा टेक्सटाइल पार्कमध्ये भूखंड हवा असेल त्यांना संपूर्ण माहितीसह नोंदणी करावी लागते. त्यानंतर उपलब्धतेनुसार त्यांना भूखंड वितरित होतो. ही थेट प्रक्रिया आहे. -राम लंके, आरओ, एमआयडीसी,अमरावती. पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. भूखंडासाठी मिलाप पोर्टलवर नोंदणी करावी लागते
Source link
वस्त्रोद्योगांसाठी आता भूखंडाचे थेट वितरण:टेक्स्टाइल पार्क, ई-निविदेऐवजी भूखंड देण्याचा निर्णय, मिलापमध्ये नव्या प्रवर्गाचा समावेश