![]()
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आमदार साजीद खान पठाण यांनी बुधवारी महिला व बाल विकास कार्यालयाला अचानक भेट घेत आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत महिलांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करून कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा आदेश दिला. या योजनेअंतर्गत समस्यांचे निराकरण न झाल्यास विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. महायुती सरकाराने मुख्यमंत्री लाकडी बहीण योजनेची घोषणा केली होती. जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या ४० लाख ४० हजारपर्यंत पोहोचली होती. निवडणुकीनंतर या योजनेतील अपात्र बहीणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली. टप्याटप्याने लाडक्या बहिणी नावडत्या होत आहेत. दरम्यान योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान महिलांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची दखल घेत आमदार साजिद खान पठाण यांनी बुधवारी महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी महिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेत प्रशासनातील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली आणि तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. या महायुती सरकारने महिलांना फक्त विधानसभा निवडणूक पुरता मोहीम राबविली होती का त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो लाडली बहिणीना या योजनेपासून अपात्र करून टाकले. जर योजना चा लाभ द्यायचा नव्हता तर योजना कशासाठी असा सवाल त्यांनी केला. यावेळी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी लक्ष्मण हगवणे, गिरीष पुसदकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कशिश खान, नगरसेविका सुवर्णरेखा जाधव रेखा डोंगरे, रंजना चावरे, दीक्षा चावरे, कुसुम चव्हाण आदी उपस्थित होते. अशी वाढली ब्रेक लागलेल्या लाभार्थ्यांची संख्या : केवायसी चुकलेल्या लाभार्थ्यांना दुरुस्ती करण्यासाठीची मुदत ३० एप्रिल रोजी संपली. या योजनेअंतर्गत ४१ हजार ६३४ अर्जदार आधीच लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. यातचार चाकी वाहन असलेल्या ५ हजार ५०८, एकाच शिधापत्रिकेत दोन पेक्षा जास्त महिलांना अर्थ सहाय्य मिळत असलेले लाभार्थी – २९ हजार ५७१, जन्म तारखेची स्पष्ट नसलेले (वय वर्ष २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त नको) ६ हजार ५५५ , संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या १३ लाभार्थी आहेत. आता ७ हजारांवर चुकलेली केवायसी दुरुस्त झालेली नाही. परिणामी लाभाला ब्रेक लागलेल्या लाडक्या बहीणींची संख्या वाढली आहे. महिलांनी घेतली होती धाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनअंतर्गत लाभ थांबल्याने लाभार्थ्यांनी गत आठवड्यात महिला-बाल कल्याण भवन येथे धाव घेतली होती.. त्यांनी याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांक डे विचारणा केली. त्यानंतर दोन ठिकाणी पडताळणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. काहींची केवायसी दुरुस्ती नसणे , तर काहींना अन्य कारणांमुळे लाभ मिळत नसल्याचे समोर आले. या ठिकाणी लाडक्या बहीणींची मोठ्या रांगा लागल्या. अधिकाऱ्यांवर ध्वनीक्षेपाकारुन सूचना देण्याची वेळ आली. गर्दी झाल्याने अन्य कामांसाठी महिला व बाल कल्याण विभागात आलेल्या नागरिकांना जाण्यासाठी जागाही नव्हती. राज्य सरकारवर टीका करताना आमदार पठाण म्हणाले की, शासकीय योजनांचा खरा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनावश्यक त्रास होऊ नये, अशा शब्दात लाभार्थींना अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर योजनांचा उद्देशच अपूर्ण राहतो. त्यामुळे या समस्यांचे तातडीने निराकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजनेतील अडचणी दूर झाल्या नाहीत तर आगामी विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा प्रभावीपणे मांडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Source link
समस्यांचे तत्काळ निराकरण करा; अन्यथा विधिमंडळात मुद्दा मांडणार:आ. साजीद खान पठाण यांनी अधिकाऱ्यांना सुनावले