Headlines

हरिनाम स्मरणातूनच जीवनाचे सार्थक:ठाणगावातील श्री स्वामी चरित्र संगीतमय चरित्रकथेत संतोष जाधव यांचे निरुपण‎

एकच धर्म मानव धर्म आणि एकच जात मानव जात आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, तर अधर्माला स्थानच उरणार नाही. आदर्श जीवन जगल्यास दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नाही, असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले. ठाणगाव (ता. सिन्नर) येथील श्री स्व . मराठी अस्मिता आणि हिंदू संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबव्यवस्थेतील…

Read More

अहंकार त्याग केल्याशिवाय भगवंत कधी भेटणार नाही- रेवतीनंदन दास:इस्कॉनतर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याची सांगता‎

श्रीमद् भागवत कथेची सांगता होते, तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळ आलेले असतात. आज घरात होम थिएटर, शाही सोफा सेट यांसारखी अत्याधुनिक सुखाची साधने उपलब्ध असूनही माणसाचे जीवन ‘अपसेट’ आहे. ताजमहालसारखा देखणा बंगला उभारला, तरीही मनात घमेंड आणि मीपणा असेल, तर तिथे श्रीकृष्ण कधीच येत नाहीत. आपण जेव्हा बासरीसारखे आतून पोकळ (अहंकाररहित) आणि खुले होऊ,…

Read More

महागाईचा चटका; 6 हजारांचा मुरघास 8 हजारांवर:जनावरे विकायची की सांभाळायची, हवालदिल पशुपालकांचा उद्विग्न सवाल‎

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून याचा थेट फटका पशुपालकांना बसताना दिसत आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न न . पाणी नसल्यामुळे चारा पिकवणे अशक्य झाले आहे. आधी स्वतःच्या शेतातून काहीतरी व्यवस्था होत होती पण आता बाजारावरच अवलंबून राहावे लागते….

Read More

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले- कोणत्याही पात्र बहिणीला वगळले नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता न करणे, आवश्यक निकष पूर्ण न होणे आणि अर्जांमधील त्रुटींमुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून, त्यांना दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत आता बंद झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, या वाढत्या…

Read More

संकट गडद:ममतांना धक्का, आता तृणमूलच्या 20 खासदारांनी दिला एनडीएला पाठिंबा, बंगाल विधानसभेनंतर आता संसदेपर्यंत बंडखोरी

तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांच्या पाठबळामुळे लोकसभेत आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ ३१३ वर गेले आहे.परंतु तृणमूलच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचे महत्त्व कमी होणार आहे. शिंदेसेनेचे ७ खासदार असून यापूर्वी पुरेशा संख्याबळाअभावी शिंदेसेनेचे दिल्लीतही राजकीय वजन होते. त्याचा लाभ त्यांना महाराष्ट्रातही होत होता. शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय एनडीएचे संख्याबळ ३०७ असे मजबूत होते. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे…

Read More

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उल्हासनगरात मोठा धक्का:जात प्रमाणपत्र अवैध ठरलं; विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द

उल्हासनगर महानगरपालिका राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विकी सिंग…

Read More

अखंड हरिनाम सप्ताहात प्रथमच भव्य रिंगण सोहळा:टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांच्या सुरांनी दुमदुमले पैठण शहर; भाविकांनी टाकली पावली‎

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या परंपरागत अखंड हरिनाम सप्ताहात प्रथमच भव्य रिंगण सोहळा झाला. वारकरी संप्रदायातील भक्तिरस, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष, अश्व रिंगणाच्या दर्शनाने शहर भक्तिमय झाले. पैठणक . संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान नगर प्रदक्षिणा झाली. खंडोबा मंदिर ते बसस्थानक या मार्गावर पारंपरिक पद्धतीने…

Read More

शंकराचार्य Go-LX वर गायी खरेदी करतील आणि विकतील:ओएलएक्सच्या धर्तीवर नवीन वेबसाइटची घोषणा, म्हणाले-गोमातेला कापू देणार नाही

गोहत्येविरुद्ध आंदोलन चालवणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आता गाईंच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीची घोषणा केली आहे. शंकराचार्यांनी “गो-एलएक्स (Go-LX)” नावाच्या एका वेबसाइटची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याद्वारे गाईंची खरेदी केली जाईल. स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले- आम्ही एक वेबसाइट बनवत आहोत. या वेबसाइटद्वारे आम्ही गाई खरेदी करू. जो पशुपालक किंवा व्यापारी आपली गाय विकू इच्छितो, तो वेबसाइटवर…

Read More

बहीण पोलिस तर भाऊ सैन्यदलात दाखल:वडिलांनी खांद्यावरून काढली मिरवणूक, दापूरा गावाची ऐतिहासिक कामगिरी‎

अकोला जिल्ह्यातील अवघ्या २,२०० लोकसंख्येच्या छोट्याशा दापूरा गावातील दोन सख्या भावंडांनी एकाच वेळी शासकीय सेवेत रुजू होऊन इतिहास घडवला आहे. नेहा निरंजन मोहोड हिने गावातून पहिली महिला महाराष्ट्र पोलिस होण्याचा बहुमान मिळवला, तर तिचा भाऊ निखिल निरंजन मोहोड हा भारतीय सैन्यदलात दाखल झाला आहे. एकाच दिवशी दोन्ही अपत्यांनी देश आणि राज्य सेवेची वर्दी परिधान केल्यामुळे…

Read More

बंगालमध्ये ममता दीदींची 'मुघलशाही' संपणार! त्या घरी जाणार- चंद्रेशखर बावनकुळे:देवस्थान इनामी जमिनींचा प्रश्न सुटणार, सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत

पश्चिम बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान झाले असून हे मतदान ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील जनक्षोभ दर्शवते. मुघलशाही पद्धतीने काम करणाऱ्या ममता बॅनर्जी आता घरी जाणार हे निश्चित आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि देवस्थान जमिनींच्या कायद्याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली….

Read More