Headlines

दावा- I-PACने बंगालमध्ये 20 दिवसांपर्यंत काम थांबवले:ममता बॅनर्जींचे निवडणूक व्यवस्थापन पाहते कंपनी; TMCने म्हटले- हे खोटं आहे

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे निवडणूक व्यवस्थापन सांभाळणारी संस्था (I-PAC) ने अचानक राज्यात आपले सर्व कामकाज तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, संस्थेने ई-मेलद्वारे पश्चिम बंगालमध्ये काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील 20 दिवसांच्या सुट्टीवर पाठवले आहे. मेलमध्ये लिहिले आहे की, 11 मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल. संस्थेने पाठवलेल्या संदेशात ‘कायदेशीर कारणांचा’ उल्लेख…

Read More

अल्पवयीन मुलींच्या गैरवर्तनाप्रकरणी आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी:शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन

परतवाडा येथील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केली आहे. सेनेच्या एका प्रतिनिधीमंडळाने अमरावती येथे जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. शिवसेनेच्या मते, ही घटना अत्यंत धक्कादायक, गंभीर आणि निंदनीय आहे….

Read More

पुण्यात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन:उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले- शिवसेना सामान्यांच्या सेवेसाठी तत्पर

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सामंत यांनी सांगितले की, शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सारसबागेजवळील शिवसेना भवनात हा कक्ष सुरू झाला….

Read More

'नोटसम्राट 2' पुस्तकाचे प्रकाशन:नोटबंदीच्या लढ्यावर आधारित, मोदींच्या निर्णयांचे समर्थन

प्रा. विनायक आंबेकर लिखित ‘नोटसम्राट 2 – नोटबंदीचा लढा’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या हस्ते ‘अग्निपंख प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि लेखक प्रा. आंबेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना केशव उपाध्ये यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Read More

Supreme Court PAN India Directions for Road Safety Expressway Heavy Vehicle Parking Ban

Marathi News National Supreme Court PAN India Directions For Road Safety Expressway Heavy Vehicle Parking Ban नवी दिल्ली5 तासांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी देशभरात अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या निर्देशांमध्ये एक्सप्रेसवेसारख्या रस्त्यांवर अवजड वाहनांच्या पार्किंगवर बंदीचाही समावेश आहे. प्रशासकीय सुस्ती किंवा पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे एक्सप्रेसवे धोक्याचे मार्ग बनू नयेत, असे…

Read More

आकाशवाणी परिसरात 'चड्डी-बनियान' गँगचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न:सीसीटीव्हीमध्ये कैद, अज्ञात आरोपीचा शोध सुरू

छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात एका अज्ञात चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ‘चड्डी-बनियान’ परिधान केलेल्या या चोरट्याचा प्रयत्न फसला असला तरी, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने आकाशवाणी परिसरातील एका एटीएम सेंटरला लक्ष्य केले. त्याने ओळखी लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधला होता…

Read More

बीडच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, ॲकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा:संस्थेच्या निष्काळजीपणामुळे नैराश्यातून टोकाचे पाऊल

पुण्यातील हांडेवाडी येथील करिअप्पा कॅम्पस परिसरातील यशोतेज ॲकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने १० नोव्हेंबर २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलीस तपासात ही आत्महत्या नैराश्यातून आणि संस्थेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ॲकॅडमीचे संस्थापक तेजस पाटील, संचालक…

Read More

हिंगोलीत वन विभागाची धडक कारवाई:विनापरवाना सागवान लाकडासह टेम्पो जप्त, उमरा फाटा शिवारात तस्करांचा डाव उधळला

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमरा फाटा शिवारात वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. १९ सागवान लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो अन लाकुड जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. वन विभागाच्या या कारवाईमुळे सागवान तस्करांमधून खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात जंगलामधून अवैध वृक्षतोड करून वाहतूक करण्याचे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने कंबर…

Read More

मोदींनी बंगालमध्ये झालमुडी खाल्ली:दुकानदाराने विचारले- कांदा खाता का, मोदी म्हणाले- कांदा खातो, डोकं नाही; ₹10 दिले

पंतप्रधान मोदी रविवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. झाडग्राममध्ये त्यांनी रॅली घेतली. यावेळी वाटेत ते एका दुकानावर थांबले आणि झालमुडी खाल्ली. झालमुडी बनवताना दुकानदाराने विचारले की, तुम्ही कांदा खाता का? पंतप्रधानांनी उत्तर दिले- हो, कांदा खातो, पण डोकं नाही. हे ऐकून दुकानदार हसू लागला. पंतप्रधानांनी दुकानदारासोबतच्या या भेटीचा सुमारे 40 सेकंदांचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर…

Read More

भोंदू राजेंद्र गडगेच्या 'दत्तधाम दरबार'वर पोलिसांची कारवाई:स्पॉट पंचनामा करत विविध औषधी जप्त; बीडच्या तरुणाची फसवणूक केल्याचे उघड

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तथाकथित ‘दत्तधाम दरबार’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या या दरबाराचा संपूर्ण परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल चार तास परिसराची कसून झाडाझडती घेत सविस्तर स्पॉट पंचनामा केला. यावेळी दरबारात भक्तांना दिल्या जाणाऱ्या विविध संशयास्पद औषधांचे नमुनेही पोलिसांनी जप्त केले असून, या धडक कारवाईने…

Read More