Headlines

निवृत्त सहायक आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक:पत्नी, मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघे रा. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन जिमखाना), दत्ता…

Read More

कानपूर-वडिलांनी जुळ्या मुलींची हत्या केली, तेथेच बसून राहिला:फोन करून पोलिसांना बोलावले, अधिकारी पोहोचले तेव्हा पत्नी म्हणाली- याला आताच फाशी द्या

कानपूरमध्ये रविवारी पहाटे 45 वर्षीय वडिलांनी आपल्या 11 वर्षांच्या जुळ्या मुलींची हत्या केली. वडिलांनी खोलीत मुलींचा गळा चिरला. नंतर मृतदेहाजवळच बसून राहिला. स्वतः पोलिसांना फोन केला. तो म्हणाला – मी माझ्या मुलींना मारले आहे. तुम्ही लोक या. पोलिस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. पोलिसांनी बेल वाजवली तेव्हा पत्नीने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहून…

Read More

नांदेड पोलिस दलातील लिपीकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या:अनैसर्गिक संबंधांसाठी लावला होता तगादा, गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील एका तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावणाऱ्या नांदेडच्या पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रविवारी ता. १९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तब्बल २२ तासांनी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी…

Read More

Ranbir Kapoors Ramayan Footage Shown at Cinemacon

34 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाबद्दल जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. लास वेगासमध्ये झालेल्या ‘सिनेमाकॉन’ (CinemaCon) या सिनेमा जगतातील मोठ्या कार्यक्रमात या चित्रपटाचे सुमारे 20 मिनिटांचे न पाहिलेले फुटेज दाखवण्यात आले. निर्माते नमित मल्होत्रा आणि यश यांनी केवळ चित्रपटाची पहिली झलकच दाखवली नाही, तर परदेशी माध्यमांशीही संवाद साधला. फुटेज पाहणाऱ्या तज्ञांचे मत…

Read More

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार:आरोपी अभिजीत गाडेविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अभिजित गाडे (वय २७, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित तरुणीने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित २४ वर्षीय तरुणीची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर आरोपीने…

Read More

रक्ताच्या नात्याला काळिमा:जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काटा काढला; चाकूने सपासप वार करून हत्या

धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरात माणुसकीला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा खून केला आहे. विलास शेळके असे आरोपीचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुणावर चाकूने वार करत जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि त्याचा पुतण्या सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून…

Read More

मॉडेल हर्षा रिछारियांनी उज्जैनमध्ये घेतला संन्यास:आता स्वामी हर्षानंद गिरी या नावाने ओळखल्या जातील, पिंडदान करून मागील जीवन त्यागले

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, कंटेंट क्रिएटर आणि मॉडेल हर्षा रिछारिया यांनी रविवारी अक्षय तृतीयेला संन्यास घेतला. त्यांना उज्जैन येथील मौनी तीर्थ आश्रमात पंचायती निरंजनी आखाड्याचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी सुमनानंद गिरी महाराज यांनी संन्यास दीक्षा दिली. संन्यास परंपरेनुसार, त्यांना शिखा आणि दंड त्यागाची विधी करवण्यात आली. त्याचबरोबर तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध कर्मही करवण्यात आले, जे पूर्व जीवनाचा…

Read More

आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट!:कथित ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक वास्तव उघड; कठोर कारवाईची मागणी

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. एका कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत भाजप जिल्हाध्यक्षांनी हा गंभीर दावा केल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या कथित रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी:हजारो समाज बांधवांची भव्य दुचाकी रॅली

छत्रपती संभाजीनगर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, ज्यात हजारो लिंगायत समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीदरम्यान समाज बांधवांनी हातात झेंडे घेऊन, घोषणाबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. ही रॅली आकाशवाणी येथील महात्मा बसवेश्वर चौकात पोहोचली,…

Read More

लातूर हादरले!:दोन भाऊ बेपत्ता, घरापासून 60 फुटांवर चिमुकल्याचा मृतदेह; दुसरा अद्याप बेपत्ता

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात दोन सख्खे चुलत भाऊ घरातून बेपत्ता झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, यातील 6 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह घराच्या अवघ्या 60 फुटांवर आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास स्वामी कुटुंबातील देवांश (6 वर्षे) आणि साईचरण (11 वर्षे) हे दोघेही बेपत्ता झाले होते, ज्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली….

Read More