Headlines

छत्रपती संभाजीनगरमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी:हजारो समाज बांधवांची भव्य दुचाकी रॅली




छत्रपती संभाजीनगर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, ज्यात हजारो लिंगायत समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीदरम्यान समाज बांधवांनी हातात झेंडे घेऊन, घोषणाबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. ही रॅली आकाशवाणी येथील महात्मा बसवेश्वर चौकात पोहोचली, जिथे महामानवांना अभिवादन करण्यात आले. चौकात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. त्यानंतर आयोजित भव्य कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून बसवेश्वरांच्या समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार संजय केनेकर, उबाठा नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे आणि बसवराज मंगरुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हजारो लिंगायत समाज बांधवांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंतीचा उत्साह वाढवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *