पुण्यात एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे गेल्या नऊ दिवसांपासून हक्कांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात काही विद्यार्थी अन्नत्याग करून
.
किडन्यांवर परिणाम होण्याचा धोका
ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके अशी उपोषण मागे घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सलग सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे या तिन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने खालावत होती. त्यांच्या किडनीवर याचा गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ नको, या भूमिकेतून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.
विश्वजित कदमांच्या हस्ते सोडले उपोषण
ज्येष्ठांच्या आवाहनाचा मान राखून अखेर या तिघांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. आमदार विश्वजित कदम आणि विराज शिंदे या चिमुकल्याच्या हस्ते दूध पिऊन या विद्यार्थ्यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली. मात्र, विद्यार्थ्यांचे उपोषण अद्यापही सुरूच आहे. पोलिसांनी कालच आंदोलकांना एस. एम. जोशी पूल मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु मागण्या मान्य होईपर्यंत हटणार नाही, या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत.
अध्यक्षांची विकेट घेतल्याशिवाय थांबणार नाही – रोहित पवार
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि लोकसेवा आयोगावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “काही विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण सोडले आहे. पण, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी हा सत्याग्रह सुरूच राहील. जोपर्यंत या भ्रष्ट अध्यक्षांची आपण विकेट घेत नाही, तोपर्यंत या आंदोलनाची सांगता होणार नाही.” विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
——————
ही बातमी पण वाचा..
MPSC विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळ खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना:पुण्यात तणावाचे वातावरण, रोहित पवार म्हणाले- मागण्यांवर ठाम

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तणाव वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनस्थळी पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतली आहे. पोलीस व्हॅनमधून वारंवार अनाउन्समेंट करत आंदोलकांना आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. रोहित पवार स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित असल्याने परिस्थिती अधिक लक्षवेधी बनली आहे. सविस्तर वाचा