Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:‘एआय’ फीचर्समुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारातील खरेदीचा बदलला ट्रेंड




नवरात्रोत्सव, दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात ग्राहकांची लगबग वाढली आहे. इलेक्ट्रिक उपकरणांची खरेदी करत असताना त्यामध्ये उपलब्ध असलेल्या ‘एआय’ तंत्रज्ञानाकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयवर आधारित फीचर्स असलेल्या उपकरणांच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली असतानाही ग्राहकांची खरेदीसाठी पसंती मिळत आहे. स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनरमध्ये आता ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होणार असून, या काळात मार्केटमध्ये होणारी उलाढाल १२५ ते १५० कोटींच्या घरात होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स सुरू केल्या असून, याचा बाजारातील उलाढालीवर परिणाम होणार आहे. यंदा इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि स्मार्टफोन तसेच लॅपटॉपच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ वाढ झाली असून, खरेदी देखील वाढण्याचा अंदाज आहे. स्मार्टफोन, टीव्ही, एसी सारख्या उपकरणांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आगामी दसरा- दिवाळीमुळे विविध ऑफर्स मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. ग्राहक ‘ईएमआय’वर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करतात. एकरकमी मोठी रक्कम न भरता ग्राहक महाग उपकरण घेऊ शकतात. अलीकडे कंपन्यांनी ‘नो-कॉस्ट ईएमआय’चा पर्याय दिल्याने खरेदी देखील वाढल्याचे व्यापारी सांगतात. उपकरणांमधील नवीन फीचर्सला ग्राहकांची पसंती ^नवीन फीचर्सला पसंती मिळत आहे. एआयचा नेमका काय उपयोग आहे, त्यातून दैनंदिन काम किती सोपे होते आणि भविष्यात त्याचा किती फायदा होईलॽ, याचा विचार केला जात आहे. टीव्ही आणि एसी, वॉशिंग मशीन आदी घरगुती उपकरणांमध्ये एआय आधारित सुविधा उपलब्ध होत असून, त्याला पसंती मिळत आहे. -सचिन खंडेलवाल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे विक्रेता, गांधी रोड. ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या दुष्काळामुळे घटली यंदा शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, याचा परिणाम बाजारावरही होत असल्याचे िदसून येत आहे. आगामी दसरा- दिवाळीतील खरेदीवरही याचा परिणाम जाणवणार असल्याचे व्यापारी सांगतात. शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांकडून इलेक्ट्रॉनिक्ससारख्या तुलनेने मोठ्या खर्चाच्या वस्तूंची खरेदी पुढे ढकलली जात आहे. लॅपटॉपच्या किमतींमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ लॅपटॉपच्या किमतीत अलीकडे २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. रॅम आणि एसएसडीसाठी वापरल्या जाणाऱ्या मेमरी चिप्सच्या किमती वाढल्याने लॅपटॉपचा उत्पादन खर्च वाढला आहे. प्रोसेसर व इतर हार्डवेअरचा वाढलेला खर्च, तसेच एआय फीचर्स लॅपटॉपमध्ये एनपीयू सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा समावेश यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत काही नव्या मॉडेलच्या किमती अधिक आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *