![]()
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘देवी अहिल्या युवती संमेलन’ उत्साहात पार पडले. माऊली संकुल सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी येथे झालेल्या या संमेलनास जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील सुमारे ६०० विद्यार्थिन
.
संमेलनाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, श्वेता गांधी, अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा, संमेलन प्रमुख सृष्टी ताके व जिल्हा संयोजक रोहन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले. क्षमा शर्मा यांनी अभाविपच्या ७८ वर्षांच्या प्रवासाची माहिती देत युवतींच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात सकारात्मक परिवर्तनासाठी आवश्यक पाच महत्त्वपूर्ण मुद्द्यांची मांडणी करत युवतींनी सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमांचा वापर करताना विद्यार्थिनींनी दक्षता बाळगावी, तसेच वैयक्तिक सुरक्षिततेबाबत सजग राहावे, असे मार्गदर्शन केले. श्वेताताई गांधी यांनी विद्यार्थिनींनी उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले. दुसऱ्या सत्रात महिला सुरक्षा व संस्कृती या विषयावर चर्चासत्र झाले.
पुण्याच्या अॅड. वर्षा डहाळे यांनी विषय मांडला. महापौर ज्योती गाडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. संमेलनाच्या समारोपानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
माऊली संकुलापासून सुरू झालेली शोभायात्रा प्रोफेसर चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेत युवतींनी आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि राष्ट्रनिर्माणाची भावना जोपासत विविध क्षेत्रांत पुढे यावे, असा संदेश संमेलनातून देण्यात आला.