Headlines

गौरी सजावटीत नागणे, इंगोले, रुपनर, भोइटे, यादव यांच्या कल्पतेचा गौरव:महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज”; डॉ. भालके यांचे प्रतिपादन



महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळते. गौरी-गणपतीसारख्या पारंपरिक सणांच्या माध्यमातून महिलांना आपली कला, कल्पकता आणि संस्कृती सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे सामाजिक कर्तव्य आहे,” अस

.

स्व. लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन, पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने गौरी-गणपती सणानिमित्त आयोजित गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी नगरसेविका साधना धोत्रे, रुक्मिणी धोत्रे, स्मिता फत्तेपूरकर, माजी नगरसेविका सुजाता धुमाळ, अक्षदा शिंदे-नाईक, संगीतादेवी धुमाळ आणि सविता देवमारे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेत महिलांनी आपल्या विविध कल्पना आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर आविष्कार सादर केला. गौरी सजावटीमध्ये पारंपरिकता, आकर्षक मांडणी, सामाजिक संदेश आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. घरातील उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून महिलांनी देखणे देखावे साकारले. त्यामुळे या स्पर्धेला केवळ विनायक मनोरंजनाचे स्वरूप न राहता महिलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा उपक्रम म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले, असे डॉ. भालके यांनी सांगितले. यावेळी बोलताना नगरसेविका स्मिता फत्तेपूरकर म्हणाल्या की, “समाजाच्या जडणघडणीत महिलांचा मोठा वाटा असून, त्यांच्या कलागुणांना व कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणारे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत. महिलांना आपली कला सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे बापू भोसले, नवनाथ आसबे, श्रवण काळे, नवनाथ पाटील, सूरज गंगथडे, प्रवीण लिमकर, तात्या नागणे, नवनाथ भिंगारे, आनंदा लामकाने, नगरसेवक विनायक देवमारे, राहुल शिंदे-नाईक आणि गणेश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि कलाविष्कारामुळे या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. प्रथम: सुनीता सुनील नागणे, द्वितीय: मोहिनी सागर इंगोले, तृतीय: रंजना सिद्धांत रुपनर, चतुर्थ: भाग्यश्री संतोष भोईटे, पाचवा: स्मिता अनिल यादव. उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्या महिलांनाही भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्पर्धेतील विजेते महिला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *