Headlines

अ‍ॅडोबने स्टुडंट स्पेसेस प्लॅटफॉर्म लॉन्च केले:AI आता स्टडी पार्टनर; अ‍ॅडोबच्या 8 टूल्सने वाचा, गुगलही नीटचे मोफत मॉक टेस्ट देत आहे

एआय आता विद्यार्थ्यांसाठी एक वैयक्तिक शिक्षक बनले आहे. अ‍ॅडोब अ‍ॅक्रोबॅट आणि गुगल जेमिनीने अलीकडेच अशी अभ्यास वैशिष्ट्ये सादर केली आहेत, जी अभ्यासाच्या पारंपरिक पद्धतीला पूर्णपणे बदलत आहेत. जिथे अ‍ॅडोब विद्यार्थ्यांना नोट्समधून काही सेकंदात पॉडकास्ट आणि फ्लॅशकार्ड्स बनवण्याची सुविधा देत आहे, तिथे गुगल भारताच्या नीट विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्ट घेऊन आले आहे. गुगलने फिलिक्सवाला आणि इतर…

Read More

संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट:माझगाव न्यायालयाचा निर्णय; प्रत्यक्ष कोर्टात राहून जामीन घ्यावा लागणार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीत मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष…

Read More

दावा- तानिया चटर्जीला युजवेंद्र चहलने पाठवली मानहानीची नोटीस:अभिनेत्री म्हणाली- मी कोणाचीही प्रतिमा खराब केली नाही, क्रिकेटपटूचा आदर करते

अभिनेत्री तानिया चॅटर्जीने नुकताच दावा केला होता की, क्रिकेटर युजवेंद्र चहलने तिला इंस्टाग्रामवर ‘क्यूट’ असे लिहून मेसेज केला होता. आता अभिनेत्रीने दावा केला आहे की, या वक्तव्यानंतर चहलने तिला मानहानीची नोटीस पाठवली आहे. शुक्रवारी पापाराझींशी बोलताना तानिया चॅटर्जीने सांगितले की, तिचा व्हायरल व्हिडिओ एका हलक्या-फुलक्या संभाषणाचा भाग होता. तिला कल्पना नव्हती की तो इतका व्हायरल…

Read More

भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा…

Read More

हिंगोलीत भाजपने निष्ठावंतांना डावलले:उपऱ्यांना पदे मिळाल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ, पण पक्षशिस्तीमुळे सर्वांचे तोंडावर बोट

हिंगोली जिल्हा भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना पदे देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र पक्ष शिस्तीमुळे कोणीही बोलण्यास तयार नसल्याने कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी वेळ आल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्हयात भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भाजपात प्रवेश घेतला जाऊ लागला आहे. त्यामुळे…

Read More

खरातच्या कार्यालयात एसआयटी, ईडीची झडती:कारवाईत बंद पाकिटांमधील पुरावे, बॅगा भरून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात

भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्यावर सक्तवसुली संचालनालयाने आपला फास अधिक घट्ट केला आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर’ या कार्यालयावर शुक्रवारी ईडी आणि एसआयटीच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मॅरेथॉन झाडाझडतीनंतर पथकाने कार्यालयातून महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि बंद पाकिटांमधील पुरावे बॅगा भरून जप्त केले आहेत. दुपारी १२…

Read More

नेवाशामध्ये 7 महिन्यांत पाइपलाइनवर 40 लाख खर्च, तरीही 7 दिवसांनी पाणी!

नेवासे नगरपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव, मुख्याधिकाऱ्यांची मनमानी आणि पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली झालेला लाखांचा कथित खर्च यावरून नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी धाव घेतली आहे. “नगरपंचायतीत नक्की चाललंय काय?” असा सवाल करत संतप्त नगरसेवकांनी जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) हराळ यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. विरोधी नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे…

Read More

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून‎जपली सामाजिक बांधिलकी‎:शहरात संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात, नागरिकांचा सहभाग

शहरातील कुंभार गल्ली येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच विविध…

Read More

घराघरातील मोबाइलमुळे लहान मुलांचे बालपणही हिरावले गेले:आईवडिलांनी मुलांना वेळ दिलाच पाहिजे, राधाकृष्ण महाराज यांचे प्रतिपादन‎

घराघरात आलेल्या मोबाइलने बालकांचे बालपण हिरावून घेतले आहे. आजच्या काळातील उपलब्ध सुख साधनांचा कसा आणि किती प्रमाणात वापर करायचा हे कळले पाहिजे. बालमनावर सुसंस्कार करण्यासाठी मातापित्यांनी वेळ दिलाच पाहिजे.‌ करिअरच्या मागे धावताना उत्तम जगण्याचा आनंद घेणे राहून गेले, असे व्हायला नको. ज्या घरात महिला आनंदी असतात त्याच घरात धनाचा वर्षाव होतो. घरातील सर्वांनी एक-दुसऱ्यांच्या सुखाचा…

Read More

बेदाण्यासह शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही चिखल:मुंगशी परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 7 ते 8 टन बेदाणा मातीमोल‎

बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, हातातोंडाशी आलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेल्या द्राक्ष बागेवर एका क्षणात पाणी फेरले गेल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. मुंगशी येथील शेतकरी…

Read More