![]()
शहरातील कुंभार गल्ली येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच विविध कीर्तन, भजन व धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिकच भारावून गेले. यावेळी आमदार संग्राम जगताप, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे उपस्थित होते. मान्यवरांनी संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते, असे मत व्यक्त केले. आ. जगताप म्हणाले, संत गोरोबा काका यांची शिकवण ही समाजाला एकत्र आणणारी आणि माणुसकीची जाणीव करून देणारी आहे. अशा धार्मिक सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तरुण पिढीला संस्कारांची दिशा मिळते. पुढील काळातही अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. कुंभार गल्ली समितीचे अध्यक्ष जयकुमार सुसरे, उपाध्यक्ष राहुल देवतरसे तसेच संत गोरोबा काका मंडळ व शिरोमणी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
Source link
आरोग्य शिबिराच्या माध्यमातूनजपली सामाजिक बांधिलकी:शहरात संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात, नागरिकांचा सहभाग