नव्या युगातील तुकाराम माहित नाहीत:मुंढेंच्या बदलीवर सदाभाऊ खोतांची टोलेबाजी; वक्तव्य चर्चेत; प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह
राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिवपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली. त्यांच्या 21 वर्षांच्या सेवाकाळात ही 25 वी बदली ठरली असून, या निर्णयामुळे प्रशासनात तसेच…