Headlines

ओझरखेड ओव्हरफ्लो; दिंडोरीकरांची टंचाई दूर:आगामी काळात सिंचनासाठी मुबलक पाणी होणार उपलब्ध; परिसरातील शेतकरी समाधानी‎

सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे २१३० दलघफू क्षमतेचे ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे दिंडोरी आणि कसबे वणी परिसरातील जलसंकट दूर झाले आहे. . ओझरखेड धरण हे दिंडोरी नगरपंचायत आणि कसबे वणी ग्रामपालिका व लगतच्या ग्रामीण भागासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. उन्हाळ्यात आणि पावसाच्या सुरुवातीला पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिक चिंतेत होते. दिंडोरी…

Read More

चंद्रपूर हादरले:माहेरी सुटीसाठी आलेल्या विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या, धोपटाळा वसाहतीमधील घटना

उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील ‘वेकोलि’च्या धोपटाळा कामगार वसाहतीत हा थरार घडला. शितल रणधीर कुंभारे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

महापुरुषांची समतेची संकल्पना ही सामाजिक न्यायाचा पाया -डॉ. गजभिये:विद्यापीठात व्याख्यान, समाजाने सजक असावे असे मान्यवरांचे सूर उमटले‎

प्रतिनिधी | अमरावती तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मांडलेली समतेची संकल्पना केवळ राजकीय हक्कांपुरती मर्यादित नसून ती मानवी मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा पाया आहे, असे मौलिक विचार कमलाताई बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार येथील डॉ. ओमराज गजभिये यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने…

Read More

20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशभर बंद:ऑनलाईन विक्री आणि कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात आंदोलन

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेते यात सहभागी होतील, अशी माहिती ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ने पत्रकार परिषदेत दिली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की,…

Read More

‘ऑपरेशन ड्रॉप केस’ फत्ते, मुक्ताईनगरात पोलिसांचा सामाजिक संघटनांकडून गौरव

जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या ऑपरेशन ड्रॉप केस मोहिमेत मुक्ताईनगर तालुक्यात यशस्वी कारवाई करत ५८ लाख ४२ हजार रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कामगिरीबद्दल प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटना, मुक्ताईनगर शाखेने पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ व सहकाऱ्यांचा विशेष सत्कार केला. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने तालुक्यातील कुऱ्हा, लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा व चारठाणा…

Read More

दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ चालला:स्क्रीनवर हॅकचा संदेश दिसला; गाणीही वाजली, मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडिओ सुरू झाला. त्यावेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस खरिया यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. ही घटना दुपारी १२:५६ वाजताची आहे. घटनेच्या वेळी खंडपीठ कोणत्या प्रकरणाची सुनावणी करत होते, हे स्पष्ट झाले नाही. पॉर्न व्हिडिओ सुरू होताच, तात्काळ सुनावणी थांबवण्यात आली. काही मिनिटांनंतर सुनावणी पुन्हा…

Read More

Disaster Emergency Alert Test Update; NDMA

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक शनिवारी सकाळी 11.45 वाजता अचानक लोकांच्या मोबाईल फोनवर बीपच्या आवाजासोबत स्क्रीनवर आपत्कालीन अलर्ट दिसला. बीप बंद झाल्यानंतर हा अलर्ट वाचूनही ऐकवला गेला. अनेक लोक यामुळे अस्वस्थ झाले, तर अनेकजण गोंधळले. खरं तर हा मेसेज राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण, म्हणजेच NDMA ने पाठवला होता, जो आपत्कालीन मोबाईल अलर्ट चाचणीचा भाग आहे….

Read More

डी.के. शिवकुमार आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बनतील, सायंकाळी 4 वाजता शपथ:मंत्र्यांच्या नावांची यादीही जाहीर होईल; सिद्धारामय्या काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य झाले

डीके शिवकुमार आज कर्नाटकचे 24 वे मुख्यमंत्री बनतील. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा सायंकाळी 4 वाजता बेंगळुरू येथील लोक भवनात होईल. शिवकुमार यांची 30 मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. ते सिद्धरामय्या यांच्या जागी राज्याची सूत्रे हाती घेतील. शिवकुमार यांनी मंगळवारी सांगितले की, काँग्रेस हायकमांड नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या मंत्र्यांची यादी बुधवारी…

Read More

प्रवासी निवाऱ्याची लोकवर्गणीतून दुरुस्ती; युवकांचे प्रेरणादायी कार्य:लोकप्रतिनिधींना लाजवेल असे केले गावातील युवकांनी काम‎

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक रचनेच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या माहुली चोर येथील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती लोकवर्गणीतून करण्यात आली. त्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या कृतीमुळे लोकप्रतिनिधींना लाजवेल, अ . सदर गाव हे अमरावती-यवतमाळ मार्गावर असल्यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिक येथूनच प्रवास करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली होती….

Read More

विकासकामे नागरिकांसाठी; दर्जाशी तडजोड कदापि नाही:रस्ता कामाची नगरसेविका बंग यांनी केली पाहणी‎

शहरातील नगरपरिषद हद्दीतील प्रभागातील विकासकामांना गती देतानाच कामांचा दर्जा कायम राखण्यासाठी नगरसेविका दिपाली रामनाथ बंग यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाहणी केली. त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती मलनिस्सारण योजनेतर्गत सुरू असलेल्या खालचा गणपती ते मौलाना आझाद चौक रस्त्याच्या पहिल्या लेयरच्या कामाची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी नगरपरिषदेचे…

Read More