Headlines

शबरीमाला सोने प्रकरण- माजी टीडीबी प्रमुखांविरुद्ध पुरावे मिळाले:केरळम हायकोर्टाने SIT ला नवीन गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली

केरळममधील शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणात एसआयटीने दावा केला आहे की, तपासात त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) चे माजी अध्यक्ष पीएस प्रशांत यांच्या विरोधात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. एसआयटीने सांगितले की, त्यांच्याकडे अनेक अधिकारी आणि बोर्ड सदस्यांच्या भूमिकेशी संबंधित पुरेसे पुरावे आहेत. तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की, या प्रकरणात गुन्हेगारी फसवणूक, बनावटगिरी आणि कटकारस्थान यांसारखे गंभीर…

Read More

पोलिसांच्या कार्यपद्धतीची घेतली माहिती:होरायझन अ कॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दिली निफाड पाेलिस ठाण्याला भेट‎

‘अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेनुसार मविप्र संस्था संचलित येथील होरायझन ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी निफाड पोलिस ठाण्याला भेट देत पोलिस प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली. शालेय अभ्यासक्रमातील ‘गुन्हेगारी प्रणाली पद्धत’ व ‘ग्रामीण प्रशासन’ या पाठांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित सोनावणे, पोलिस…

Read More

मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’…:रेडिओ चाहत्यांसाठी आवाजाने जपली संगीताची जादू; रेडिओ ते हार्डडिस्क प्रवास

मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’… “आवाज की दुनिया के दोस्तो…” अशी साद पडली की आजही कान टवकारणारे अनेक रसिक शहरात आहेत. पण गुलमंडीवर राहणाऱ्या जगन्नाथ बसैये यांची संगीताप्रति असलेली आवड आणि निष्ठा निव्वळ थक्क करणारी आहे. १९७६ मध्ये पत्रलेखनापासून सुरू झालेला त्यांचा गाण्यांच्या फर्माइशीचा प्रवास आज थेट आधुनिक हार्डडिस्कपर्यंत येऊन पोहोचला आहे. संगीत ही…

Read More

ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत भडका:पदावरून हटवताच जिल्हाप्रमुखाकडून कार्यालयाची तोडफोड, सामानही काढून नेले

एकीकडे मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’च्या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी उद्या, १४ जून रोजी ‘मातोश्री’वर सर्व खासदारांची आणीबाणीची बैठक बोलावली असताना, दुसरीकडे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आणि नाराजीचा राज्यभर मोठा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गडचिरोलीत जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती होताच माजी जिल्हाप्रमुखांनी थेट पक्ष कार्यालयाचीच तोडफोड करून सर्व साहित्य पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, लातूरमध्ये…

Read More

दावा- डिझेल महागल्यामुळे 19 लाख ट्रक बंद:मालवाहतूक भाडे 15% पर्यंत वाढले, खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात

डिझेल महाग झाल्यामुळे ट्रान्सपोर्टर्सनी ट्रक उभे करायला सुरुवात केली आहे. परिस्थिती अशी आहे की, देशभरातील 95 लाख ट्रकमधून सुमारे 20% म्हणजे 19 लाख ट्रक रस्त्यांवरून हटवले गेले आहेत. इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, डिझेलची कमतरता आणि वाढलेल्या किमतींमुळे ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी मालवाहतुकीचे भाडेही वाढवले आहे. पश्चिम ते उत्तर भारत यांसारख्या मुख्य मार्गांवर…

Read More

नरगिस फाखरीने जयपूरमध्ये स्वतः कुल्हड चहा बनवला:लक्झरी कार सोडून ई-रिक्षातून फिरली, जयपूरच्या देशी शैलीचा आनंद घेतला

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी सध्या तिच्या जयपूर दौऱ्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘जयपूरला सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही फिल्टरची गरज नव्हती… आणि मलाही नाही’ या कॅप्शनसह एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पिंकसिटीचे सौंदर्य, येथील संस्कृती, खाद्यपदार्थ आणि सामान्य जीवन अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये नरगिस एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे नव्हे, तर…

Read More

सासवड माळी एज्युकेशन सोसायटीत आर्थिक कारभारातून उफाळला वाद:चौकशीसाठी संचालकांचे पाचव्या दिवशीही धरणे आंदोलन‎

माळीनगर येथील सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावरून संस्थेमध्ये वाद निर्माण झाला असून, काही संचालकांनी विविध मागण्यांसाठी सलग आठ व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची धर्मादाय आयुक्तांकडून सखोल चौकशी करून विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, संस्थेच्या प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून…

Read More

आज सोने ₹756 आणि चांदी ₹3493 ने महाग:10 ग्रॅम सोने ₹1.42 लाखांवर आणि 1 किलो चांदीची किंमत ₹2.19 लाखांवर पोहोचली

सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 3,493 रुपयांनी वाढून 2,18,967 रुपयांवर पोहोचली आहे, जी शुक्रवारी 2,15,474 रुपयांवर होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 756 रुपयांनी वाढून 1,41,915 रुपयांवर आले आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी ते 1,41,159 वर होते. या महिन्यात सोन्याचे दर 283 रुपयांनी…

Read More

शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून 70 लाख लुटले:मोबाइल रिचार्ज करणे महागात पडले, अमरावतीच्या दांपत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शेतजमीन विक्रीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर डोळा ठेवून एका ६४ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यात आले आहे. केवळ मोबाइल रिचार्ज करण्याच्या निमित्ताने ओळख वाढवून, अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका दांपत्याने या वृद्धाला तब्बल ७० लाख रुपयांनी लुटले. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दांपत्याविरुद्ध खंडणीचा…

Read More

शेतधुरे जाळण्याच्या नादात सरकारी झाडे खाक:गुन्हे दाखलची मागणी, पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दिले कारवाईसाठी निवेदन‎

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यालगत असलेल्या नैसर्गिक व वृक्षारोपण केलेल्या मौल्यवान सरकारी झाडांना आग लावून नष्ट करण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. . उन्हाळ्यात बाळापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतकरी शेतधुरे जाळत असताना, लगतची सरकारी झाडेही पेट घेत आहेत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक झाडे पेटवली जात असल्याचा आरोप करत अनंतराव फाटे, जयश्री फाटे, अनिल गावंडे…

Read More