Headlines

पशुपालकांची गैरसोय:औराळ्याचा पशुवैद्यकीय दवाखाना 15 दिवसांपासून बंद, खासगी उपचारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट




कन्नड तालुक्यातील औराळा येथे शासनाने ३० लाख खर्च करून पशुवैद्यकीय दवाखान्याची सुसज्ज इमारत उभारली खरी, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या १० ते १५ दिवसांपासून हा दवाखाना बंद अवस्थेत आहे.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांचे आजार वाढत असतानाच दवाखान्याला कुलूप असल्याने औराळा आणि परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. या दवाखान्यात एक महिला अधिकारी आणि एक कम्पाऊंडर कार्यरत आहेत. मात्र, ते कधी येतात आणि कधी जातात, याचा कोणताही नेम नाही. दवाखान्याच्या बाहेर कोणताही नामफलक किंवा सेवा माहिती फलक लावलेला नाही. त्यामुळे औराळा, औराळा तांडा, शिरोडी, कविटखेड, हसनखेड, गव्हाली, धनगरवाडी, विटा, निपाणी या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या गायी, म्हशी, बैल आणि शेळ्यांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांना पाचारण करावे लागत आहे. यामुळे गरीब शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून जनावरांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. औराळा येथील श्रेणी-१ दवाखान्यासोबतच जेहूर आणि चापानेर येथील श्रेणी-२ च्या दवाखान्यांचा अतिरिक्त कार्यभारही येथीलच अधिकाऱ्यांकडे आहे. एकाच अधिकाऱ्याकडे तीन-तीन ठिकाणची जबाबदारी असल्याने आणि लंपी आजाराच्या लसीकरणाचे कारण पुढे केले जात असल्याने औराळा येथील मुख्य दवाखानाच कुलूपबंद ठेवण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. औराळा, जेहूर आणि चापानेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांना केवळ कागदावर प्रभार न देता, त्या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी आणि कम्पाऊंडरची नियुक्ती करण्यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा,अशी मागणी आहे. अधिकारी हजर नसल्याने पशुपालकांची गैरसोय औराळा येथे श्रेणी-१ चा दवाखाना असूनही कर्मचाऱ्यांअभावी तो शोभेची वस्तू बनला आहे. गेल्या १५ दिवसांपासून येथे कोणीही फिरकलेले नाही. शासनाने तात्काळ येथे कायमस्वरूपी डॉक्टर द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थ सुभाष रिंढे यांनी केली. औराळा, जेहूर आणि चापानेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांना केवळ कागदावर प्रभार न देता, त्या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी आणि कम्पाऊंडरची नियुक्ती करण्यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी पशुपालकांमधून करण्यात येत आहे. लसीकरणामुळे अतिरिक्त ताण वाढला Ãमी औराळा सर्कलमधील गावांमध्ये लंपी रोगाचे लसीकरण करत आहे. माझ्याकडे जेहूर आणि चापानेर या श्रेणी-२ दवाखान्यांचाही अतिरिक्त प्रभार आहे. अतिरिक्त कर्मचारी नसल्यामुळे लसीकरणासाठी बाहेर जावे लागते, त्यामुळे औराळा दवाखाना बंद ठेवावा लागत आहे. – डॉ. सीमा पठाण, पशुवैद्यकीय अधिकारी, औराळा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *