ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली आहे. “पूर्णेकर कुटुंबीयांशी माझे वैयक्तिक आणि जिवलग संबंध असून विद्यार्थी सेनेच्या काळापास
.
तसेच, “केवळ पुरवणी जबाबात संशयित म्हणून नाव आले म्हणून जर मीनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी केली जात असेल, तर दिशा सालियान प्रकरणात वडिलांच्या तक्रारीत आणि कागदपत्रांमध्ये उघड उल्लेख असलेल्या आदित्य ठाकरेंनी स्वतःहून आधी अटक व्हावे; मग मीनाक्षी शिंदेही स्वतःहून अटक होतील,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
पूर्णेकर कुटुंबाशी जुनी मैत्री, एसआयटीमार्फत कठोर कारवाई होणार
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवर दुःख व्यक्त करताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “बाळकृष्ण पूर्णेकर आणि जयनाथ पूर्णेकर हे माझे जिवलग मित्र आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असल्यापासून आम्ही एकत्र वाढलो आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्या कुटुंबाशी माझे आजही अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या कुटुंबाला प्रामाणिकपणे न्याय मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे.”
“या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ (SIT) गठीत करण्यात आली असून संशयितांना तत्काळ ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. आरोपी कोणीही असो, कितीही मोठा असो, पोलीस यंत्रणा कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल.”
केवळ पुरवणी जबाबात नाव म्हणून अटक? मग आधी आदित्य ठाकरेंना अटक करा!
माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेच्या मागणीवर ठाकरे गटाला घेरताना म्हस्के म्हणाले, “मूळ एफआयआरमध्ये मीनाक्षी शिंदेंचे नाव नव्हते. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात दबाव तंत्र वापरून पुरवणी जबाबात त्यांचे नाव जबरदस्तीने घुसडल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. अशा संशयावरून जर अटकेची भाषा केली जात असेल, तर हेच नियम ठाकरेंना का लागू होत नाहीत?”
दिशा सालियान प्रकरणाची आठवण
“दिशा सालियानच्या वडिलांनी उघडपणे आरोप केले आहेत की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाराचा गैरवापर करून पुरावे नष्ट केले आणि आदित्य ठाकरे या प्रकरणात जबाबदार आहेत. तिथे ठाकरेंची नावे असताना त्यांना अटक का झाली नाही? जर तुमच्यात हिंमत असेल, तर आदित्य ठाकरेंनी दिशा सालियान प्रकरणात स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करावे, मीनाक्षी शिंदेही एका मिनिटात स्वतःहून अटक होतील,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
दिनो मोरिया आणि मिठी नदी घोटाळ्यावरून राऊत-ठाकरेंना घेरले
आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अभिनेता दिनो मोरियाची सुरू केलेल्या चौकशीचा संदर्भ देत म्हस्के म्हणाले, “दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून मिठी नदी प्रकरणात चौकशी सुरू आहे. हा दिनो मोरिया नेमका कोणाचा मित्र आहे? तो रात्रंदिवस कोणासोबत फिरतो? दिशा सालियान प्रकरणातही त्याचे नाव आले होते आणि आता मिठी नदीतील भ्रष्टाचारातही त्याची चौकशी होत आहे. अशा व्यक्तींसोबत फिरणाऱ्यांनी इतरांना नीतिमत्ता शिकवू नये.”
संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरांच्या ऑडिओ क्लिपवर उत्तर द्यावे!
संजय राऊतांकडून समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आलेल्या कथित ऑडिओ क्लिप्सवर संतप्त प्रतिक्रिया देत म्हस्के म्हणाले, “आपलाच एक कार्यकर्ता मृत्युमुखी पडला असताना मूळ हल्लेखोर शोधण्यात पोलिसांना मदत करण्याऐवजी राऊत ऑडिओ क्लिप्सचे राजकारण करत आहेत. जर राऊतांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या आरोपांच्या आणि धमक्यांच्या ऑडिओ क्लिप्स आधी स्वतःच्या ट्विटरवर प्रसिद्ध कराव्यात आणि सांगावे की त्या क्लिपमधील भाषा खरी आहे का? आणि त्यावरून तुमच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये?”
क्लिष्ट विषयांना वेगळे वळण देण्याचा डाव
“ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या प्रकल्पाला बाळू पूर्णेकरांचा नेहमीच पाठिंबा होता. मात्र, ठाकरे गट प्रत्येक विषयाला गुन्हेगारीचे आणि राजकीय पोळ्या भाजण्याचे वळण देत असून जनतेला आता यांचे दुटप्पी धोरण पूर्णपणे समजले आहे,” असा घणाघात नरेश म्हस्के यांनी शेवटी केला.
—————————————-
हेही वाचा…
पूर्णेकर हत्येच्या आरोपांवर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार: ऑडिओ क्लिप AI जनरेटेड; दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंना अटक का झाली नाही?

ठाण्यातील चितळसर-मानपाडा (प्रभाग क्र. ३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाकडून होणाऱ्या गंभीर आरोपांवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र, या दुःखाचा गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे घाणेरडे राजकारण उबाठा गट करत आहे. मूळ एफआयआरमध्ये (FIR) आमचे नाव नसताना केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या पतीला यात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत आहेत,” असा घणाघाती आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी