Headlines

हिंगोलीत कारसह 10 लाख रुपयांचा गुटखा जप्त:चालक फरार, शोध सुरू; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील सुर्यमुखी हनुमान मंदिर भागात अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने गुरुवारी ता. २१ टाकलेल्या छाप्यात गुटखा व कारसह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसाय तसेच गुटखा विक्री, अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन,…

Read More

ऑटो चेक क्लिअरिंगमध्ये फसवणूक; केमिकलने नावे मिटवत आहेत:जलद क्लिअरिंग प्रणालीमध्ये मोठी त्रुटी, रंग आणि लिखाणातील बदल ओळखणे कठीण

अमेरिकेत जुन्या काळातील एक घोटाळा नव्या आणि धोकादायक स्वरूपात परत आला आहे. फसवणूक करणारे रसायनांचा वापर करून चेकवरील नाव आणि रक्कम मिटवून ते स्वतःच्या नावावर करून घेत आहेत. यामुळे चेक फसवणुकीची प्रकरणे विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. एफबीआय आणि यूएस पोस्टल सर्व्हिसने लोकांना कागदी चेकऐवजी डिजिटल पेमेंट स्वीकारण्याचे आवाहन करत इशारा जारी केला आहे. फसवणूक करणारे…

Read More

प्रतिभा चाकणकरांनी खोटे बोलून हात झटकले:KYC केलेले खाते बनावट कसे असू शकते? दमानियांचा सवाल; कॉल रेकॉर्ड्सचा डाटा सादर

नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी “खाती बनावट असून सह्या देखील खोट्या आहेत” असा दावा केला होता. प्रतिभा चाकणकर यांच्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. “KYC केलेले खाते कधीही बनावट असू शकत नाही,” असे सांगत दमानिया…

Read More

ISIशी संबंधित मध्य प्रदेशातील 3 तरुणांना अटक:दिल्ली पोलिसांचा खुलासा- मंदिर, ढाबा आणि मिलिटरी कॅम्प उडवणार होते; पाकिस्तानला पाठवले होते फोटो

दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ISI शी संबंधित असल्याचा दावा करत मध्य प्रदेशातील तीन तरुणांना अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की हे लोक दिल्लीतील ऐतिहासिक मंदिर, दिल्ली-सोनीपत महामार्गावरील एक ढाबा आणि हरियाणातील लष्करी तळ उडवणार होते. त्यांची ओळख टीकमगढ, नेगुवां (पृथ्वीपूर पोलीस ठाणे) येथील रहिवासी अनमोल राय (24), ग्वाल्हेर, डबरा येथील रहिवासी राजवीर (21)…

Read More

दिव्य मराठी स्टिंग:सायबर ठग वापरतात मुंबईतल्या चाेर बाजारातील माेबाइलचा डेटा, ई-कचऱ्यातून डेटा चाेरीचे रॅकेट

घरातील फुटलेला किंवा पूर्णपणे डेड मोबाइल भंगार समजून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे विकणे धोक्याची घंटा ठरत आहे. हा डेड फोन सायबर गुन्हेगारांसाठी कोट्यवधींची खाण आहे. असे मोबाइल तोकड्या किमतीत वा प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात विकत घेऊन त्यांची रॅम मुंबईतील कामाठीपुरातीलचोर बाजारातून थेट चीन, हाँगकाँगच्या सायबर माफियांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा प्रवास ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला आहे….

Read More

गिल सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळणार नाही:बोटाला दुखापत, राहुल कर्णधारपद सांभाळत आहे; श्रीलंका-ए ने फलंदाजी निवडली

भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल श्रीलंका इलेव्हन (SLC XI) विरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळत नाहीये. बीसीसीआयने सांगितले की, गुरुवारी सरावादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. सराव सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद केएल राहुल भूषवत आहे. यजमान श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लंच ब्रेकपर्यंत २९ षटकांत एक विकेट…

Read More

विदेशी नागरिकांची फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या माजी महापौरांना दिलासा:बनावट कॉल सेंटर प्रकरणात सात महिन्यांनंतर सुटकेचा मार्ग मोकळा

बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटक झालेल्या जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सात महिन्यांपासून नाशिक कारागृहात असलेल्या कोल्हेंना जामीन मंजूर करण्यात आला असून, ते लवकरच कारागृहाबाहेर येणार आहेत. या निर्णयामुळे कोल्हे कुटुंबीयांसाठी हा मोठा कायदेशीर दिलासा मानला जात आहे. या प्रकरणाची सुरुवात जळगाव शहराजवळील ममुराबाद रस्त्यावरील कोल्हे यांच्या…

Read More

CJPचा आरोप- BJP कार्यकर्त्यांची वर्करच्या वडिलांना मारहाण, मृत्यू:तरुणाने शाळेच्या दुरवस्थेचा तयार केला होता व्हिडिओ; 8 जणांना अटक

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे नेते आशुतोष रांका यांनी दावा केला की, पक्षाचे कार्यकर्ते शेख अब्दुल हफीज यांच्या वडिलांचा मृत्यू भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर झाला. CJP चे एक पथक सोमवारी पश्चिम बंगालमधील बांकुडा येथे पोहोचले आणि हफीज यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हफीज यांचे वडील मफीक यांच्यावर 13 ऑगस्ट रोजी काही लोकांनी हल्ला…

Read More

राज्यात गुन्हेगारांना यंत्रणेचा धाक उरला नाही:विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारित करा, आमदार रोहित पवार यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्यात गुन्हेगारांना यंत्रणेचा धाक राहिला नसल्याचा आरोप करत सरकारला एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारित करण्याचा सल्ला दिला आहे. महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्यात कायदेच अडचण ठरत…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस यांचे पालखेड विजय स्मारकास सर्वतोपरी सहकार्य:बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणास उपस्थित राहणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ऐतिहासिक विजय स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. स्मारकाच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, स्मारक पूर्ण झाल्यानंतर उभारण्यात येणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची तयारीही त्यांनी दर्शविली…

Read More