Headlines

हिंगोलीत कारसह 10 लाख रुपयांचा गुटखा जप्त:चालक फरार, शोध सुरू; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




हिंगोली शहरातील सुर्यमुखी हनुमान मंदिर भागात अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने गुरुवारी ता. २१ टाकलेल्या छाप्यात गुटखा व कारसह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसाय तसेच गुटखा विक्री, अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून जिल्हाभरातील अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. कार सोडून चालक फरार दरम्यान, हिंगोली शहरातील सुर्यमुखी हनुमान मंदिर परिसरात एका कारमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अप्पर पोलिस अधिक्षक कलमेश मीना, जमादार संदीप पवार, विनोद कुटे, सतीष नरवाडे, सुमीत टाले, अर्जुन सुर्यवंशी यांच्या पथकाने पहाटेच त्या भागात जाऊन पाहणी केली. पोलिसांना पाहताच कार चालक कारसह पळून जात होता. पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केल्यानंतर त्याने काही अंतरावर कार सोडून पळ काढला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यात पोत्यामध्ये गुटखा आढळून आला. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांनी कार, गुटखा व एक मोबाईल असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त करून हिंगोली शहर पोलिसांच्या हवाली केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कारच्या चालकाचा शोध सुरु केला आहे. तर त्याच्या मोबाईलवरून कोणाशी संपर्क झाला, गुटखा कोठून आणला होता त्याच्यासोबत कोण कोण संपर्कात होते याची माहिती घेण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *