Headlines

राहुल म्हणाले- विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही:त्याऐवजी त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी; नीटमध्ये जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना भेटले

राहुल गांधींनी शनिवारी चेन्नईमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी X वर पोस्ट करून लिहिले- विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, उलट त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. त्यांनी पुढे म्हटले की, पालकांना आपल्या मुलाचा शोक करताना पाहण्यापेक्षा अधिक वेदनादायक काहीही असू शकत नाही. नीट पेपरफुटीनंतर पंतप्रधान ना पीडित पालकांना भेटले आहेत, ना अशा कोणत्याही विद्यार्थ्यासोबत बसले आहेत ज्याचे…

Read More

सिद्धिविनायक मंदिरातून 18 कोटींच्या दानचोरीचा आरोप:राज ठाकरेंचा घणाघात, तर विश्वस्तांचेही प्रत्युत्तर; काय आहे प्रकरण?

मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहाराच्या चर्चेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातही दरवर्षी १८ कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा केल्याने हा विषय अधिकच चर्चेत आला. मात्र, या दाव्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष तथा आमदार…

Read More

अमित शहांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेसचे आंदोलन:अनेक पदाधिकारी ताब्यात, युवक काँग्रेसकडून पोलिस कारवाईवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसने शनिवारी आंदोलन करत अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे अनेक पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दौऱ्यापूर्वी मध्यरात्रीच युवक काँग्रेस व शहर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत घरातून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसने…

Read More

अण्णा भाऊ साठेंचे साहित्य जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे:डॉ. बळीराम गायकवाड यांचे मसाप परिसंवादात प्रतिपादन

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य साम्यवादातील वर्गसंघर्ष आणि डॉ. आंबेडकरांच्या समानतेच्या शिकवणीवर आधारित असून, ते जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केले. फ्लोरिडा विद्यापीठाचे फुलब्राईट फेलो असलेल्या डॉ. गायकवाड यांनी हे निरीक्षण नोंदवले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) अण्णा भाऊ साठे यांच्या…

Read More

लाडकी बहीणनंतर एसटी बसच्या सवलतींची झाडाझडती:450 कोटींच्या परताव्यावर सरकारचे प्रश्नचिन्ह; महामंडळाला ऑडिटचे निर्देश

‘लाडकी बहीण’ योजनेतील कोट्यवधी अर्जांची सूक्ष्म छाननी केल्यानंतर, राज्य सरकारने आता आपला मोर्चा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे वळवला आहे. एसटीतून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवासातील सवलतींच्या मोबदल्यात, महामंडळाकडून सरकारकडे जो परतावा मागितला जातो, त्याची आता अत्यंत काटेकोर पडताळणी केली जाणार आहे. महामंडळाची ढासळलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी परिवहन विभागाने आता ‘आर्थिक शिस्तीचा’…

Read More

आषाढी वारीत डायल 108 अंतर्गत विशेष सेवा:2,445 वारकऱ्यांना फायदा, 27 रुग्णवाहिका 24 तास सेवेत; पंढरपूरमध्ये नियंत्रण कक्ष

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डायल १०८) अंतर्गत विशेष आरोग्यसेवा पुरवण्यात आली. या सेवेमार्फत २७ रुग्णवाहिका २४ तास तैनात होत्या, ज्यांनी एकूण २,४४५ वारकऱ्यांना वेळेत वैद्यकीय मदत दिली. ही सेवा बीव्हीजीद्वारे संचालित केली जाते. वारकऱ्यांना तात्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी पंढरपूर येथे एक विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून पालखी…

Read More

CJP च्या आंदोलनात सहभागी शिक्षक निलंबित:प्राचार्यांनी सांगितले- महिला शिक्षिकेला फरफटत नेत मारहाण; शिक्षक म्हणाला- सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकाला पोलिसांनी प्रभारी प्राचार्य आणि माजी प्राचार्यांना ओढत-ओढत मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. शिक्षकाने शाळेत महिला शिक्षिकेचे केस ओढल्याचा आरोप आहे. शिक्षण विभागाने त्याला निलंबितही केले आहे. दरम्यान, अटकेनंतर शिक्षक वरुण नायकने प्रसारमाध्यमांना आपल्या शरीरावरील जखमा दाखवल्या. त्यांच्या पाय, पाठ आणि हातावर…

Read More

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक:विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचे प्रतिपादन

तंत्रज्ञानाच्या वेगाने वाढीमुळे गुन्हेगारीचे स्वरूपही बदलले आहे. पारंपरिक चोरी आणि दरोड्यांऐवजी आता ऑनलाइन फसवणूक, डिजिटल आर्थिक गुन्हे आणि सायबर हल्ले वाढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी पुरेशी माहिती आणि जागरूकता नसल्याने अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे केवळ पोलीस यंत्रणाच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस…

Read More

अजिंठा चित्रे तत्कालीन वस्त्रपरंपरा, कलाकारांचे उच्च कौशल्य दर्शवतात:शेफाली वैद्य यांचे ‘डायलॉग’ उपक्रमात प्राचीन वस्त्रकलेवर सादरीकरण

पुणे, प्रतिनिधी: अजिंठा लेण्यांमधील चित्रे तत्कालीन वस्त्रपरंपरेचा उत्तम नमुना आहेत. ही चित्रे त्या काळातील कलाकारांचे उच्च दर्जाचे तंत्रकौशल्य, कलात्मक दृष्टी आणि निरीक्षणशक्ती दर्शवतात, असे मत भारतीय हातमागावरील वस्त्रपरंपरा आणि मंदिर वास्तुकलेच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले. पुण्यातील इंडी हेरीटेज आणि परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डायलॉग’ या उपक्रमांतर्गत ‘प्राचीन भारतीय…

Read More

ज्येष्ठ नागरिकाची 28 लाखांची फसवणूक:आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून गंडा

पुणे, प्रतिनिधी: आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २८ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदाराने एक आयुर्विमा पॉलिसी काढली होती. गेल्या…

Read More