संगणक अभियंता महिलेसह दोघींची आत्महत्या:छळामुळे आत्महत्या केल्याचे उघड; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
वाघोली परिसरात छळाला कंटाळून एका संगणक अभियंता महिलेसह दोन महिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, एका प्रकरणात संगणक अभियंता महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत, वाघोली येथे एका ३७ वर्षीय संगणक अभियंता महिलेने आत्महत्या केली. तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार,…