पुणे शहरात जड वाहनांना तात्पुरती बंदी:15 ते 24 जून दरम्यान वाहतुकीत मोठे बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ ते २४ जून २०२६ या कालावधीत जड, अवजड आणि बहु-अॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत असला तरी, रस्ते आणि पर्यायी मार्ग मर्यादित आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई…