Headlines

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:सातरगाव मार्गावर भीषण अपघात, एक गंभीर जखमी




सातरगाव ते राजूरवाडी मार्गावर बुधवारी रात्री उशिरा एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. अविनाश ज्ञानेश्वर भलावी (वय ३०, रा. सत्तरपूर वडाळा, ता. आष्टी) असे मृतकाचे नाव आहे. सुनील उईके (वय ४०, रा. सत्तरपूर वडाळा, ता. आष्टी) हे जखमी झाले आहेत. दोघेही तिवसा येथील एका लग्नसमारंभातून परतत असताना हा अपघात घडला. तिवसा येथून लग्न आटोपून नातेवाईकांकडे जात असताना, सातरगाव ते राजूरवाडी मार्गावर मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अविनाश भलावी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुनील उईके गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *