बुवासिद्ध देव यात्रा:कावड निघाली… राहुरी दुमदुमली! कावड, झेंडा मिरवणुकीसह धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी
राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुवासिद्ध देवांच्या वार्षिक यात्रा उत्सवाला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केल्याने संपूर्ण राहुरी शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे बुवासिद्ध देवांच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला….